बार्शीचा रमेश घोलप एमपीएससीत राज्यात पहिला

मुंबई,दि. १ – राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) २०११मध्ये घेतलेल्या मुख्य परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. यात बार्शी गावातील रमशे गोरख घोलप हा अपंग विद्यार्थी राज्यात पहिला आला आहे. मनिषा धोंडिराम छोठे ही मुलींमधून आणि मागासवर्गीयांमधून प्रथम आली आहे.

रमेशने नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतही २८७वा क्रमांक पटकावला होता. एमपीएससीच्या यशानंतर त्याची नियुक्ती उपमुख्य कार्यकारी अधिकारीगट विकास अधिकारी, गट-अ (उच्च श्रेणी) या पदावर करण्यात आली आहे. मनिषाची नियुक्ती सहायक विक्रीकर आयुक्त, गट-अ या पदावर करण्यात आली आहे. एमपीएससीचे यश मला अपेक्षित होतेच. मी या परीक्षेसाठी खूप जय्यत तयारी केली होती. यामुळे मला हमखास यश मिळणार हे अपेक्षित होतेच, असे रमेश आत्मविश्वासाने सांगितले. भविष्यात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नियुक्त पदावरच काम करण्याची त्याची इच्छा आहे.

Leave a Comment