चीनद्वारे भारतीय लष्कराचे सिस्टम हॅक

नवी दिल्ली, दि.२ – भारताच्या सुरक्षेत एक मोठे छिद्र पडले आहे. वृत्त येत आहे की, चीनने भारतीय लष्कराचे संगणक हॅक करून गुप्त माहिती चोरी केली आहे. चीनने संगणकाला वायरसद्वारे हॅक केले आहे. माहितीनुसार लष्कराचे तीन संगणक हॅक झाले आहे आहे. सुत्राचे मानले तर विशाखापट्ट्नममध्ये सध्या ईस्टर्न नेवल कमांडचे काही संगणकांना हॅक करून त्यामार्फत माहिती जमा करण्यात आली. वृत्त असेही आहे की, हॅकर्सने या संगणकात बग प्लांट करून गुप्त डेटा जमा केला.

त्यानंतर ती गुप्त माहिती चीनमधील उपलब्ध आयपी ऍडरेसवर पाठवण्यात आले. ईस्टर्न नेवल कमांडमध्ये दक्षिण चीन समुद्रात भारतीय ऑपरेशन व डिप्लॉयमेंटशी संबंधित योजनावर काम होते. इतकेच नव्हे भारताचे पहिले न्यूक्लियर सब-मेरीन क्षेपणास्त्र आयएनएस अरिहंतचे ईस्टर्न नेवल कमांडमध्ये ट्रायल देखील सुरू आहे. चीनचे संगणक हॅक करण्याचे वृत्त आल्यानंतर स्थानिक पातळीवर चौकशी करण्यात आली. ही चौकशी पूर्ण झाली आहे.

लष्कर मुख्यालय तपास अहवालाची प्रतिक्षा करत आहे. अहवालाच्या आधारावर एखादे पाऊल उचलल्या जाईल. दिल्लीत नेवल हेडक्वार्टरने यावर नजर ठेवली आहे. चीन अरुणाचल, जम्मू काश्मीरच्या सीमावर्ती भागात वायु सीमा क्षेत्राचे उल्लंघन करत असते. काही दिवसापूर्वी पीएमच्या अध्यक्षतेत एक बैठक झाली होती. उल्लेखनीय आहे की, ही पहिली वेळ नाही जेव्हा चीनने भारताच्या सुरक्षेवर हल्ला केला असेल. यापूर्वी चीनने भारतालगत असलेल्या आपल्या वादग्रस्त सीमेजवळ शिनघाई-तिबेट पठारीय उंची असणार्‍या भागात एक मोठ्या लष्कराचा सराव केला होता ज्यात त्याने पहिल्यांदा बहुउद्देश्य लढाऊ विमान जे-१० चे परीक्षण केले.