घसेदुखीने हैराण आहात?- हे करून पहा

throatin

घसा हा आपल्या अन्नमार्गातील तसेच श्वसनमार्गातील एक महत्त्वाचा अवयव आहेच पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण ज्यामुळे आवाज काढू शकतो ते स्वरयंत्र या घशातच असते. त्यामुळे घशाची काळजी घेणे जसे गरजेचे असते तसेच घशाच्या किरकोळ तक्रारींवरही उपचार त्वरीत करणे आवश्यकच असते. खोकला, सर्दी झाली असल्यास आपला आवाज बदलतो. अनेकवेळा घसा बसतो आणि बोलणे अवघड होते याचा अनुभव आपण कधी ना कधी घेतलेला असतोच. त्यामुळे या महत्त्वाच्या अवयवासाठी घरच्या घरी कोणते उपचार करता येतात त्याची माहिती खाली दिली आहे.
throat
दूध , हळद व साखर याचे गरमागरम मिश्रण पिण्याने घसादुखी कमी होते, लवंग चघळण्यानेही घसादुखी कमी होते. बरेच वेळा खवखवण्याचा त्रास आपल्याला होतेा. अशावेळी घसा खवखवत असल्यास खडी साखर आणि चिमूटभर कात (विडे करताना घालतात तो ) जिभेवर ठेवून चघळावा. त्याने खूपच आराम पडतो.
throat1
आख्खा सालासकट वेलदोडा गालात धरावा. अथवा कात व साखर मिश्रण चघळावे. कफ झाला असल्यास विडयाची पाने ठेचून रस काढावा व मधाबरोबर चाटावा. छाती, पाठ शेकण्यानेही कफ सूटून येतो. तोंड येणे म्हणजे जीभ हुळहुळी होणे. तोंड येण्यामुळे जीभेवर फोड येतात तसेच तिखट अजिबात जिभेला लागू देत नाही. जीभ लालभडक होते. अशा वेळी दोन दिवस आहारात फक्त द्रव पदार्थ घ्यावेत. फळांचे रस, दूध, ताक, सरबत यांसारखे पदार्थ घ्यावेत.

throat2

तोंड येण्या मागे बिघडलेले पचन हे मुख्य कारण असते. आणि पोटाला दोन दिवस आराम दिला की पोट मूळपदावर येते आणि जिभेला आलेली लाली व पुरळ कमी होण्यासही मदत मिळते. वेलदोडा दाणे व  साखर एकत्र चघळणे. बसलेल्या घशावर कोमट केलेल्या मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करण्यानेही घसा दुखणे, बसणे याला उतार पडतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

1 thought on “घसेदुखीने हैराण आहात?- हे करून पहा”

  1. मि हा पेपर न चुकता वाचतो. मला यातुन खुप माहिति मिऴालि आहे.

Leave a Comment