`ब्लॅकबेरी-१०’ लांबणीवर, ’रिम’ करणार नोकरकपात

न्यूयॉर्क – दि. ३०- `ब्लॅकबेरी’ मोबाईल फोन्सच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. ब्लॅकबेरीची निर्माती `रिसर्च इन मोशन’ जवळपास ५ हजार कर्मचार्‍यांची कपात करणार आहे. तसेच बहुप्रतिक्षित ब्लॅकबेरी-१० या नव्या ऑपरेटींग सिस्टिमचे लॉंचिंगही लांबणीवर टाकले आहे.

जागतिक बाजारपेठेत सध्या ब्लॅकबेरीची हॅण्डसेटची विक्री मंदावली आहे. ऑपरेटींग सिस्टिमच्या स्पर्धेत ब्लॅकबेरीला ऍण्ड्राईडने जबरदस्त आव्हान दिले. त्यामुळे कंपनीने ब्लॅकबेरी-१० ही नवी सिस्टिम सादर करण्याची घोषणा केली. परंतु, आता तिचे सादरीकरण लांबणीवर टाकण्यात आले आहे. पुढील वर्षी पहिल्या तिमाहीपर्यंत ब्लॅकबेरी-१० सादर होणार नाही. ब्लॅकबेरी-१० मध्ये अतिशय अद्ययावत फिचर्स राहणार आहेत. त्यामुळे प्रोग्रामिंग किचकट आहे. त्यासाठी अपेक्षेपेक्षा बराच वेळ लागत आहे, असे कंपनीने अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

Leave a Comment