ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्याची सुरूवात रहमानच्या संगीताने

प्रख्यात संगीतकार ए.आर. रहमान पुन्हा एकदा हॉलीवुड निर्देशक डॅनी बॉयलसोबत काम करत आहेत. यावेळी ते लंडन ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यासाठी एक गीत बनवण्यासाठी एकत्र काम करतील. हे एक पंजाबी गीत राहील जे ब्रिटेनमध्ये भारतीय प्रभावाला प्रदर्शित करेल.

रहमानने सोशल नेटवर्किंग वेबसाइट फेसबुकद्वारे सांगितले, मी ऑलिम्पिकसाठी गीत तयार करण्याचे वृत्त स्पष्ट करत आहे. हे एक पंजाबी गीत आहे, जे ब्रिटेनमधील भारतीय प्रभाव प्रदर्शित करेल. रहमान व बॉयलने ऑस्कर विजेता ‘स्लमडॉग मिलियनेयर‘ व ‘१२७ ऑवर्स‘ चित्रपटासाठी एकत्र काम केले आहे.

डॅनी बॉयलच्या रचनात्मक शुभकामनानुसार हे गीत ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यातील घटक राहील. असेही वृत्त आहे की, दक्षिण भारतीय अभिनेता कमल हसनचा १९८० मध्ये आलेला चित्रपट ‘राम लक्ष्मण‘ चे इलियाराजाचे गीत ‘नान्थान उंगाप्पांडा‘ देखील उद्घाटन सोहळ्यातील भाग राहील. लंडन ऑलिम्पिक-२०१२ ची सुरूवात २७ जुलैला होऊन १२ ऑगस्टपर्यंत याचा समारोप होईल.

Leave a Comment