विम्बलडन डायरी : ओरडण्यावर निर्बंधाचा प्रयत्न

लंडन, दि. ३० – विम्बलडनाचे आयोजक एक नवीन नियम बनवण्याबाबत विचार करत आहे ज्याअंतर्गत सामन्यादरम्यान कोणताही खेळाडू शॉट लावताना जोराने ओरडू शकणार नाही. मारिया शारापोवा सारख्या खेळाडूंचा कोणताही गतिशील शॉट विना ओरडल्याशिवाय निघत नाही. ऑल इंग्लंड क्लब याबाबत महिला टेनिस असोसिएशनच्या अधिकार्‍यांशी चर्चा करत आहे. दरम्यान, या चलनाची सुरूवात सत्तरच्या दशकात जिमी कॉनर्सने केली होती. याचा उद्देश्य ब्योर्न बोर्गच्या एकाग्रता भंग करण्याचे होते. नंतर ऐंशीच्या दशकात मोनिका सेलेसने महिला टेनिसमध्ये याचे प्रचलन वाढवले. पूर्वी देखील व आजकाल टेनिस खेळाडूंचा एक मोठा वर्ग याचा विरोध करत आहे.

प्रत्येक ओरडणे मोजले जाईल
आता योजना ही आहे की, पंचाकडे ग्रंटो मीटर राहील आणि जर शॉट लावताना निघालेला आवाज स्वीकृत मापदंडापेक्षा जास्त असला तर त्याला रिकॉर्ड केले जाईल. गेल्यावर्षी टेनिस सामन्या दरम्यान ओरडण्याचे चलन इतके वाढले की, बीबीसीने दर्शकांच्या तक्रारीवर गोंधळ कमी करण्यासाठी एक विशेष उपकरण `विम्बलडन नेट मिक्स’ लावले. ज्यामुळे खेळाडूंच्या ओरडण्याचा आवाज फेड आउट करून कमेंटेटर आवाजाचे वॉल्यूम वाढवण्यात आले.

या ओरडण्याची ब्रिगेडची निर्विवादित नेत्या मारिया शारापोवा आहे. काही कालावधीपासून तिचे ओरडणे १०५ डेसेबल मोजण्यात आले होते. पिरनकोवाविरूद्ध सामन्यातही ती इतक्याच जोराने ओरडत होती. जर्मन खेळाडू सबीन लिसिकीने आपली प्रतिस्पर्धी बोजाना जोवानोस्कीकडून ओरडण्याविरूद्ध पंचाकडे औपचारिक तक्रार केली होती. शारापोवा व्यतिरिक्त ओरडण्यामध्ये ऍलीना देमेंतिएवा, विक्टोनिया अजारेंका, मिशेल लार्चेर,मार्टिनो लोपेज, राफेल नडाल व नोवाक जोकोविचे नावे सर्वात वर घेतले जाते.

Leave a Comment