
नवी दिल्ली, दि. ३० – रेल्वे प्रशासन आपल्या तत्काळ तिकीट सेवेच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्याच्या विचारात आहे. तत्काळ तिकीट बुकींगच्या वेळेतही बदल होणार आहेत. रेल्वेच्या बुकींग क्लार्कला बुकींग रुममध्ये मोबाईल घेऊन जाण्याची परवानगी नसणार आहे. तसेच तत्काळ काऊंटरवर जास्त सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत.
