रतन टाटा यांना जीवनगौरव पुरस्कार

न्यूयॉर्क – टाटा सन्सचे चेअरमन आणि उद्योगपती रतन टाटा यांना जगप्रसिद्ध रॉकफेलर फाऊंडेशनच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. परोपकारी कार्य व नवीन परिवर्तनातील योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

यानिमित्त आयोजित कार्यक्रमात रतन टाटा म्हणाले की, उद्योगजगतात काम करणार्‍या मंडळींनी संवेदनशील असावे. त्यांनी सदैव समाजाला समृद्ध करण्याचे काम करावे.

Leave a Comment