मानवी जीनच्या प्राचीन अंशाचा शोध

वॉशिंग्टन, दि. ३० – वैज्ञानिकांनी स्पेनमध्ये आढळलेल्या ७ हजार वर्षांपूर्वीच्या दोन गुहा मानवाच्या हाडांवरून आधुनिक मानवाच्या जीनचा प्राचीन अंश असल्याचा दावा केला आहे.

संशोधकांनी म्हटले की, या भागात राहणारे गुहामानव आजच्या लोकांचे पूर्वज नव्हते. स्पॅनिश नॅशनल रिसर्च कौन्सिलमधील संशोधक कार्लेस लैलुएजा फॉक्स यांनी सांगितले की, प्रागैतिहासिक काळाच्या आधुनिक मानवाचे हे सर्वात जुने अंशिक जीन आहेत.

कँटाबेरियन डोंगरात २००६ मध्ये करण्यात आलेल्या खोदकामादरम्यान मिळालेले दोन सांगाडे युवा पुरुषांचे असल्याचे मानले जाते. येथे कडाक्याची थंडी असते. त्यामुळे हाडांमधील डीएनएच्या संरक्षणात मिळाली आहे.

संशोधकांनी सांगितले की, ही हाडे तेव्हाची आहेत जेव्हा नवपाषाण युगातील लोक आणि त्याचबरोबर शेतीचा पश्‍चिम आशियातून आयबेरियाई बेटापर्यत विस्तार झालेला नव्हता.

संशोधकांनी दोन्ही गुहामानवांच्या हाडातून १.३४ टक्के आणि ०.५ टक्के मानव जीन आढळले. हे दोन्ही गुहामानव शिकारी होते, असे मानले जाते.

विषेशकांच्या मते, आयबेरियाई बेटात सध्या राहत असलेल्या लोकांमध्ये स्पेन, पुर्तगाल आणि एंडोरा निवासी यांचा समावेश आहे. या लोकांची जीन संरचना गुहामानवांच्या सांगाड्यातील जीन संरचनेशी नाही तर उत्तर यूरोपमधील सध्या राहत असलेल्या लोकांशी जुळते.

Leave a Comment