दंतेवाडाच्या जंगलात चकमकीत २० नक्षलवादी ठार

दंतेवाडा(छत्तीसगड) दि.२९ – दंतेवाडाच्या घनदाट जंगलात केंद्रीय राखीव पोलीस दलाने(सीआरपीएफ) शुक्रवारी केलेल्या चकमकीत किमान २० नक्षलवादी ठार झाले. त्यात एका महिलेचा समावेश आहे. या चकमकीत सहा ‘सीआरपीएफ’चे जवान मृत्युमुखी पडले.
दंतेवाडा जंगलातील सिल्जर वनक्षेत्रात ‘सीआरपीएफ’ने गुरुवारी मध्यरात्री नंतर ३०० जवानांना बरोबर घेऊन तिन्ही बाजूने नक्षलवाद्यांवर हल्ला केला. त्यांना राज्य पोलीस अधिकार्‍यांनीही मदत केली.

आत्तापर्यंत चकमकीच्या जागेवरून नक्षलवाद्यांचे १७ मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत, असे सांगून छत्तीसगडचे अतिरिक्त उपमहानिरीक्षक राम निवास म्हणाले की, जंगलात नक्षलवाद्यांचा शोध घेण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. चकमकीत जखमी झालेल्या दोन नक्षलवाद्यांना ताब्यात घेण्यात आले असून वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना विमानाने रायपूरला हलविण्यात आले आहे, असे ‘सीआरपीएफ’च्या अधिकार्‍यांनी सांगितले.

या चक्रमकीत बिजापूर आणि दंतेवाडा येथील दोन  प्रमुख नक्षलवादी ठार झाले.‘सीआरपीएफ’चे सहा जवान या चकमकीत जखमी झाले आहेत. त्या पैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. या सर्व जखमींना विमानाने रायपूरला आणण्यात आले.

Leave a Comment