जुंदालविषयी कसाबची पुन्हा चौकशी शक्य

मुंबई, दि. ३० – पोलिसांची गुन्हे शाखा अबू जुंदालच्या भूमिकेसाठी आर्थर रोड तुरुंगात बंद असलेला २६-११ हल्ल्यातील एकमेव जिवंत पाकिस्तानी दहशतवादी अजमल आमीर कसाबची पुन्हा चौकशी होऊ शकते.

कसाबने कोर्टात प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान, एक वेळेस जुंदालचे नाव घेतले होते. याचा अर्थ हा आहे की, त्याच्याकडे याविषयी मोठ्या प्रमाणात माहिती आहे. कसाब न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे पोलिस त्याच्याशी याबाबत जास्त चौकशी करु शकले नव्हते.

सूत्रांनुसार, कसाब आपल्या हिंदी शिकवणारा उस्ताद जुंदालच्या अटकेने आश्चर्यचकीत झाला आहे. तथापि, कसाबला तुरुंगात वृत्तपत्रे दिली जात नाही. परंतु सुरक्षेसाठी असलेले पोलिस आणि सुरक्षारक्षकांना तो देशभरातील माहिती विचारत असतो. जुंदालच्या अटकेची माहितीने आश्चर्यचकीत कसाबने माहिती देणार्‍यास अनेक प्रश्‍न, जसे की, जुंदालला एकट्यालाच पकडले का, कधी पकडले आदी.

सूत्रांनुसार, पोलिस जुंदालविषयी नवी माहिती मिळविण्यासाठी दोघांना वेगवेगळे आणि समोरासमोर बसवून चौकशी करु शकते. निकम यांच्यामते, जुंदाल तथा त्याचे चार सहकार्‍यांच्या आवाजाची पुष्टी तसेच पुढील चौकशीतील त्याची साक्ष पाकवर दबाव टाकण्यासाठी महत्त्वाची ठरू शकते.

Leave a Comment