गँग्ज ऑफ वासेपूर

रामधीर सिंह (तिग्मांशू धुलिया, एका कडक भूमिकेत) वासेपूरचा दबंग माफिया डॉन आहे. वासेपूर आधी कमी लोकसंख्या असलेला भाग होता. मात्र आता बिहारमधील धनबादचा एक मोठी लोकसंख्या असलेला भाग बनला आहे. बर्‍याच वर्षांपासून या भागात कोळशाच्या खाणींवरुन राजकारण आणि गुंडगिरीचा खेळ खेळला जातो. चित्रपटातसुद्धा कोळशाच्या खाणींवरुन राजकारण आणि गुंडगिरीचा कसा खेळ खेळला जातो हे पाहायला मिळते. इंग्रज गेल्यानंतर स्थानिक पातळीवरील राजकारणी या खाणी आपल्या ताब्यात घेतात. रामधीर आता सत्तेच्या जोरावर उन्मत्त झालेला खासदार आहे.

आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसातच रामधीरने पहलवान शाहिद खान (जयदीप अहलवात)चा खात्मा केलेला असतो. शाहिद खान एक दबंग स्टाईलचा मजूर असून आपल्या मालकाविरोधात उभा ठाकतो. त्यामुळे शाहिद आपल्या वाटेत अडचणी निर्माण करेल असे रामधीरला वाटते आणि म्हणूनच वाटेत अडचणी निर्माण करणार्‍या शाहिदचा काटा काढण्याचे रामधीर ठरवतो. एके रात्री रामधीर शाहिदला आपल्या गाडीतून घेऊन जातो, त्यानंतर मात्र शाहिद कधीच परत येत नाही. शाहिदचा मुलगा त्याची वाट बघत राहतो. मात्र रामधीरने आपल्या वडिलांची हत्या केल्याचे एक दिवस मुलाला कळते.

हा मुलगा म्हणजे सरदार खान. (मनोज वाजपेयी, दमदार कमबॅक) शाहिदचा मित्र फरहान (पीयूष मिश्रा) सरदार खानचे पालनपोषण करतो. सरदारही आपल्या वडिलांप्रमाणे निर्भय असतो. आपल्या वडिलांच्या हत्येचा सूड उगवण्याचे तो ठरवतो. टक्कल करुन रामधीरला ठार केल्यानंतरच केस वाढवण्याचा तो निर्धार करतो. हीच सिनेमाची मुळ कथा आहे. आता सरदार हा चित्रपटाचा नायक, रामधीर व्हिलेन असून चित्रपट रीवेंड ड्रामा आहे की काय असे आपल्याला वाटते. मात्र हे समजून जर का तुम्ही तुम्ही चित्रपट बघणार असाल तर ही तुमची मोठी चुक असेल. कारण मग तुम्ही चित्रपट बघण्याची मजा गमवाल. खरे तर हा चित्रपट इतर फिचर फिल्मसारखा मुळीच नाहीय. हा एका चित्रपटापेक्षा मल्टीपार्ट मिनी सीरिज आहे. कश्यपच्या २००४मध्ये आलेल्या ’ब्लॅक फ‘ायडे’प्रमाणे हा मल्टीपार्ट मिनी सीरिज सिनेमा आहे.

खरे तर आपण जे चित्रपट बघतो त्या चित्रपटांमध्ये त्याची एक निश्चित सुरुवात (मुळ कथा), मध्यंतर (टर्निंग पॉईंट), आणि शेवट (क्लायमॅक्स) असतो. मात्र या चित्रपटात असे काही आहे, हे मुळीच भासत नाही.

सरदार खान (मनोज वाजपेयी) काहीसा रंगीन स्वभावाचा व्यक्ती आहे. त्याला दोन पत्नी असतात. एकीपासून (रिचा चठ्ठा) त्याला तीन मुले आहेत. तर दुसरी पत्नी ही आसनसोलची बंगालन (रीमा सेन) असून तिच्यापासून एक मुलगा आहे. रामधीरशी सरदारचे वैर असते. मात्र आपल्या शत्रुला सहजासहजी संपवणे हे सरदारला मान्य नसते.

चित्रपटाच्या शेवटपर्यंत सरदारची (मनोज वाजपेयी) मुले मोठी झालेली असतात. सरदारचा थोरला मुलगा (नवाजुद्दीन) आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत वाटचाल करतो. त्यामुळे वैरत्वाची आग विझतच नाही. ही कथा इथेच संपत नाही. तर सरदार खानच्या मुलांच्या लग्नानंतरही ही आग तशीच भडकत राहते. या चित्रपटात तीन पिढ्यांच्या कथेचा हा पसारा स्वातंत्र्यापुर्वीपासून ते १९९०च्या दशकापर्यंत विखुरलेला आहे. तीन पिढ्यांच्या कथेचा हा पसारा इतका मोठा आणि विस्तृत आहे की, त्यामुळे सिनेमा कुठे चाललाय हे समजतच नाही.

चित्रपटाच्या कथेचा मुळ उद्देश बंगाल आणि झारखंडच्या बॉर्डरवरील लँण्डस्केपला कॅप्चर करणे हा आहे. या भागात मुळात कायदे-नियमच नाहीत. कायदे-नियम धाब्यावर बसवणार्‍यांची येथे हुकुमत असते. प्रांतीय तांड्यांच्या पार्श्वभूमीवर तयार झालेल्या चित्रपटांमध्ये आपल्याला हा प्रकार नेहमीच पाहायला मिळतो

हिंदी मसाला चित्रपट बघणार्‍या प्रेक्षकांच्या पसंतीला हा चित्रपट उतरेलच असे नाही. मुळात चित्रपट बघायला आलेले प्रेक्षक स्वत:च्या जीवनात असलेल्या अडचणींमुळेच इतके त्रस्त असतात की, पुन्हा चित्रपटांमध्ये तेच पाहायला त्यांना मुळीच आवडत नाही. उदाहरणार्थ आपण ७०च्या दशकात आलेल्या यश चोपडाच्या मेलोड्रॅमिक `त्रिशुल’ला बघून लट्टू होतो. तर यश चोपडाच्याच धनबादच्या कोळशा खाणीत चित्रीत करण्यात आलेल्या `काला पत्थर’ (१९७९)लाही आपण तितकीच पसंतीची पावती देतो.

धनबाद हा भारतातला असा भाग आहे, जिथे दिवंगत सूरजदेव सिंहसारख्या माफिया डॉनचे नाव घेताच आजही लोकांच्या मनात भीती थरकाप उडतो. मास्टरपीस मकबूल (२००४)च्या दुसर्‍या भागाचे चित्रीकरण धनबादमध्ये करण्याची विशाल भारद्वाजची इच्छा होती. जर हा चित्रपट तयार झाला असता तर कदाचित या चित्रपटापेक्षा खूप वेगळा ठरला असता.

गँग्ज ऑफ वासेपूर रक्ताच्या थारोळ्यातल्या इतिहासाची व्यग्र कथा आहे. चित्रपटांमध्येही स्त्रीप्रधान आणि पुरुषप्रधान चित्रपट असे वर्गीकरण करण्यात आले आहे. ’गँग्ज ऑफ वासेपूर’ हा सिनेमा पुरुषप्रधान सिनेमांच्या कॅटेगरीत मोडतो. या चित्रपटात ज्याप्रमाणे लोकांना मारण्यात आले आहे, त्यावरुन हे लोक आत्ताही जिवंत असतील हे फारच चमत्कारीक वाटते.
जर हा चित्रपट नसता तर एक स्टाकयलाइज्डर ग्राफिक नॉव्हेल असते. मात्र त्यामुळे आपल्याला उत्तम बॅकग्राउंड स्कोर आणि साऊंड डिझाइनला मुकावे लागले असते. हा चित्रपट नक्कीच तुम्ही तुमच्या डीवीडी सेटमध्ये जपूण ठेऊ शकता, कारण ही अनुराग कश्यपची आपल्या आठवणीत साठवून ठेवावी अशी कलाकृती आहे.

Leave a Comment