उमा भारती यांना जीवे मारण्याच्या धमक्या

भोपाळ दि.२९- भाजपच्या फायरब्रँड नेत्या उमा भारती यांना त्यांच्या मोबाईलवर ठार मारण्याच्या धमक्या येत आहेत. उत्तरप्रदेशात भाजपच्या एमएलए असलेल्या उमा भारतींनी याबाबत भोपाळ पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला असल्याचे समजते.

उमा भारती जून २६ ला भोपाळहून दिल्लीला भोपाळ एक्स्प्रेसने जात होत्या तेव्हा त्यांच्या मोबाईलवर पहिला फोन आला आणि त्यात तुम्हाला ठार करणार आहोत अशी धमकी दिली गेली. सुरवातील भारती यांनी फोनकडे दुर्लक्ष केले पण त्यानंतरही जवळजवळ सहा वेळा फोनवरून त्यांना अशीच धमकी देण्यात आली तेव्हा उमा भारती यांचे सुरक्षा अधिकारी प्रदीप तोमर यांनी पोलिसांत एफआयआर दाखल केला. फोन करणार्‍या व्यक्तीने त्याचे नांव अंजू श्रीवास्तव असे सांगितले असले तरी या व्यक्तीची ओळख पटू शकलेली नाही.

पोलिसांनीही त्वरीत मोबाईलवर आलेल्या नंबरचा छडा लावण्याचे काम सुरू केले असून हे फोन उत्तरप्रदेश व मध्यप्रदेशाच्या सीमेवरील गावांतून येत असल्याचे निष्पन्न झाले आहे. पुढील तपास सुरू आहे.

Leave a Comment