अमेरिकेच्या वायुसेनेत महिला प्रशिक्षणार्थींचा लैंगिक छळ

वॉशिंग्टन, दि. ३० – अमेरिकेच्या वायुसेनेमध्ये वाढत्या सेक्स स्कँडल्सने प्रशासनाच्या नाकी नऊ आणले आहेत. वायुसेनेत दाखल झालेल्या ३१ महिला कॅडेटसचा प्रशिक्षकांकडूनच लैगिंक छळ झाल्याचे उघडकीस आले आहे.

या प्रकरणात टैक्सासच्या सान एन्तोनियो भागातील लॅकलँड एअरफोर्स बेसच्या १२ पुरुष प्रशिक्षकांची चौकशी सध्या सुरू आहे. हे सर्व ३३१ व्या प्रशिक्षण स्क्वाड्रनमधील आहेत. याच ठिकाणावरुन सर्वाधिक तक्रारी आल्या आहेत. या स्क्वाड्रनच्या कमांडरला यापूर्वीच निलंबित करण्यात आले आहे.

वायु सेना शिक्षण आणि प्रशिक्षण कमांडचे कमांडर जनरल एडवर्ड राईस यांनी यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, पिडीत महिलांचा लैगिंक छळ किती दिवसांपासून सुरू होता हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु, २००९ पासून महिला कॅडेटसवर असे अत्याचार सुरू होते, असा अंदाज आहे. आतापर्यंत ३१ महिलांवरील अत्याचार समोर आला आहे. आणखी काही महिला अशा छळाला सामोरे गेल्या असतील, तर त्यांनी तक्रार करावी, असेही राईस यांनी म्हटले आहे.

पीटर माल्डोनाडे नावाच्या एका सार्जेंटने एका प्रशिक्षणार्थीसोबत शारिरीक संबंध असल्याचे मान्य केले. याशिवाय यापुर्वी १० प्रशिक्षणार्थींबाबतही असे सबंध होते, असेही त्याने कबुल केले आहे. वायुसेनेमध्ये असे प्रकार करण्यास बंदी आहे.

वायुसेनेपासून अलिप्त असलेल्या वायुसैनिक अधिकार्‍यांकडून या प्रकरणाचा स्वतंत्र तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Leave a Comment