अखेर पेस लंडन ऑलिंपिकमध्ये खेळण्यास तयार

लंडन दि. ३० –  अनुभवी लिएंडर पेस शेवटी लंडन ऑलिंपिकमध्ये खेळण्यास राजी झाला आहे. भारतीय टेनिसच्या वादानंतर त्याने ऑलिंपिकवर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली होती.

ऑलंपिकमधील भागीदारीवरुन अबोल असलेल्या पेसने येथे सुरु असलेल्या विम्बलडनमध्ये चेक गणराज्याचा राडेक स्टीपानेकसोबत पहिल्या फेरीतील सामना जिंकल्यानंतर पत्रकार परिषदेत याची पुष्टी केली.

पेस म्हणाला, मी ऑलिंपिकमध्ये त्या संघासोबत देशाचे प्रतिनिधित्त्व करेल, ज्याची निवड अखिल भारतीय टेनिस संघाने केली आहे. मी येथे खेळण्यासाठी आलो आहे, राजकारण करण्यासाठी नाही. भारतचा नंबर एकचा खेळाडू असतानाही विष्णु वर्धन सारख्या जूनियर खेळाडूसोबत जोडी बनविण्यावरुन नाराज झालेल्या पेसने ऑलिंपिकवर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली होती.
पेसचे आवडते जोडीदार महेश भूपती आणि रोहन बोपन्नाने त्याच्यासोबत खेळण्यास नकार दिला. एआयटीएने शेवटी दबावापुढे झुकून दोन संघ ऑलिंपिकला पाठविण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळे पेस नाराज झाला होता.

पेसची मिश्र दुसरीत सानिया मिर्झासोबत जोडी बनवण्यात आली तर त्याने महेश भूपतीसोबत नुकताच फ्रेंच ओपन जिंकला होता. सानियानेही पेसला लक्ष करत म्हटले की, त्याला राजी करण्यासाठी आपला वापर आमिषाप्रमाणे करण्यात आला आहे.

Leave a Comment