सांडपाणी प्रक्रिया उद्योग

watertreat


करिअरच्या आणि नोकर्‍यांच्या क्षेत्रामध्ये काही संधी अशा आहेत की, ज्याकडे लोकांचे अजून म्हणावे तसे लक्ष गेलेले नाही. अशा संधीमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा उद्योग ही एक उत्तम संधी आहे. सध्या आपल्या देशातले पाण्याचे प्रश्‍न किती गंभीर होत आहेत, याची कल्पना आपल्याला आहेच. आगामी काळामध्ये पाण्याचा प्रश्‍न एवढा बिकट होणार आहे की, पाण्याचा प्रत्येक थेंब हिशोबाने वापरावा लागणार आहे. सांडपाणी गटारात तसेच सोडून न देता त्यावर प्रक्रिया करून ती पुन्हा वापरता येते आणि त्यातून पाण्याची बचत होऊ शकते.

इस्राईलसाख्या देशामध्ये समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी शेतीसाठी वापरले जात असते. भारतातही अशी वेळ येणारच आहे आणि ती येईल तेव्हा या क्षेत्रामध्ये लाखो रोजगार निर्माण होणार आहेत. त्याशिवाय आता आपण जे पाणी पितो ते पाणी खूप दूषित असते. त्यामुळे रोगराई वाढत आहे. ती कमी होण्यासाठी प्रक्रिया करून शुद्ध केलेले पाणी पिण्याकडे लोकांचा ओढा आहे. नळाला येणारे नगरपालिकेने शुद्ध केलेले पाणी वापरण्याची हिंमत राहिलेली नाही. वरचेवर लोक असे शुद्ध केलेले पाणीच वापरणार असल्यामुळे या उद्योगाला प्रचंड संधी आहे. पाणी शुद्ध करण्याच्या या प्रक्रियेमध्ये पाण्याला अशुद्ध करणारे जे घटक आहेत ते ओळखणे आणि ते काढून टाकणे या दोन प्रक्रियांचा समावेश होत असतो. म्हणून रसायन शास्त्र, प्राणी शास्त्र, वनस्पती शास्त्र, मायक्रो बायालॉजी आणि अभियांत्रिकी या शाखांचे शिक्षण घेतलेल्या पदवीधरांना या क्षेत्रात उत्तम संधी आहे.

अमेरिकेसारख्या देशामध्ये पाण्यावर प्रक्रिया करण्याचा उद्योग फार मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. या क्षेत्रात होत असलेल्या वाढीचा विचार करून अधिकाधिक कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यावर भर द्यावा लागत आहे. त्यातूनच अनेक संस्थांनी या विषयाचे ज्ञान देणारे अभ्यासक्रम सुरू केलेले आहेत. भारतामध्ये पाण्याच्या शुद्धीकरणाच्या बाबतीत अजूनही म्हणावी तशी जागृती निर्माण झालेली नसल्यामुळे आज तरी या क्षेत्राला असलेल्या संधीची जाणीव अजून निर्माण झालेली नाही. मात्र हळू हळू आपले राहणीमान वाढत आहे, त्यामुळे पिण्याचे पाणी शुद्ध असले पाहिजे असा अट्टाहास लोकही करायला लागले आहेत. त्याशिवाय पाण्यासाठी संघर्ष सुरू झाल्यामुळे आहे तेच पाणी पुन्हा पुन्हा प्रक्रिया करून वापरण्याचा विचार कोठे कोठे होत आहे. त्यामुळे आज नसेल पण येत्या दहा वर्षात पाण्याचे शुद्धीकरण हा व्यवसाय प्रचंड वाढलेला दिसणार आहे. पिण्याचे पाणी शुद्ध करून विकणे हा एक छोटा उद्योग याच गरजेतून निर्माण झालेला आहे. बाटलीबंद पाण्याच्या अनेक कंपन्या सुरू आहेत आणि त्या वाढणार आहेत. तेव्हा पाण्यावर प्रक्रिया करण्याचे अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांना थोड्या भांडवलामध्ये घरगुती स्वरुपात हा व्यवसाय करता येऊ शकतो. त्याशिवाय मोठ्या प्रमाणावर जलशुद्धीकरण करणार्‍या कंपन्या उदयाला आल्या तर त्यांनाही प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज लागणारच आहे. भारतामध्ये काही संस्थांनी हळू हळू लहान-मोठे अभ्यासक्रम सुरूही केलेले आहेत. दिल्लीच्या सेंटर फॉर सायन्स ऍन्ड एनव्हायरनमेंट या संस्थेने सांडपाणी प्रक्रिया करण्याचे शिक्षण देणारे अनेक अभ्यासक्रम सुरू केलेले आहेत. या संस्थेत या विषयाचे पदविका, पदवी आणि पदव्युत्तर असे अभ्यासक्रम तर सुरू आहेतच, पण नगरपालिकांसारख्या संस्थांमधील संबंधित कर्मचार्‍यांना या विषयाचे ज्ञान देण्यासाठी १५ दिवसांचे छोटे प्रशिक्षण कार्यक्रमही सुरू केले आहेत.

या संबंधात आणखी अधिक माहिती जाणून घेऊ इच्छिणार्‍या उमेदवारांनी खालील पत्त्यावर संपर्क साधावा. मेराजोद्दीन अहमद, वॉटर मॅनेजमेंट युनीट सेंटर फॉर सायन्स ऍन्ड एनव्हायरनमेंट, ४१, तुघलकाबाद इन्स्टिट्यूशनल एरिया, न्यू दिल्ली ११००६२. फोन नं. ९१-११-२९९५ ५१४२, ६३९४, ६३९९. मोबाईल ९८९९८२०९४५. ई-मेल ऍड्रेस – [email protected] अशाच प्रकारचे अभ्यासक्रम एशियन अकॅडमी ऑफ प्रोफेशनल ट्रेनिंग या संस्थेनेही सुरू केलेले आहे. ही संस्था पुण्यात आहे. तिचा पत्ता – एशियन अकॅडमी ऑफ प्रोफेशनल ट्रेनिंग, सेकंड फ्लोअर, आदिनाथ शॉपिंग सेंटर, सिटी प्राईड मल्टीप्लेक्स जवळ, पुणे-सातारा रोड, पुणे ३७. ई-मेल   [email protected] किंवा [email protected] असा आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि पुण्यात डीजी लॅब याही संस्थेने या संबंधातील अभ्यासक्रम सुरू केलेले आहेत. पुण्याच्या विश्‍वकर्मा इन्स्टिट्यूट या संस्थेनेही पाण्यावर प्रक्रिया करण्याविषयीचे अभ्यासक्रम सुरू केलेले आहे. त्यांचा पत्ता –
Vishwakarma Institute of Technology 666, Upper Indiranagar, Bibwewadi,
Pune, Pin- 411 037. Pune, Maharashtra Contact Details:     Phone: 020-24202214
Fax: 020-24280926
Email: [email protected]
Web Site: http://www.vit.edu/

Leave a Comment