पाक अध्यक्ष झरदारींपेक्षा इम्रान खान अधिक लोकप्रिय

इस्लामाबाद दि.२८- पाकिस्तानेच अध्यक्ष असीफ अली झरदारी यांची लोकप्रियता माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्यापेक्षाही कितीतरी खाली गेली असल्याचे प्यु रिसर्च या संस्थेतर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. विशेष म्हणजे क्रिकेटकडून राजकारणात गेलेला इम्रान खान पाकिस्तानी जनतेची पहिली पसंती असल्याचेही येथे स्पष्ट झाले आहे. इम्रान ला दर दहा नागरिकांत सात जणांनी पहिली पसंती दिली आहे.

झरदारी यांची लोकप्रियता २००८ सालात ६४ टक्के होती ती २०११ सालात ११ टक्क्यांवर घसरली. यावेळच्या सर्वेक्षणात त्यात थोडी सुधारणाच झाल्याचे दिसत असले तरी ही टक्केवारी १४ टक्के इतकीच आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून पंतप्रधानपद गमवावे लागलेल्या माजी पंतप्रधान युसुफ रजा गिलानी यांना ३६ टक्के नागरिकांनी पसंती दिली आहे. माजी अध्यक्ष नवाज शरीफ यांना विरोधीपक्ष नेता म्हणून दहा पैकी सहा जणांनी पसंती दर्शविली आहे. शरीफ यांना २००९ साली ७९ टक्के नागरिकांकडून पसंती दर्शविली गेली होती. मुशर्रफ यांचा नंबर यात बराच खाली आहे.

विशेष म्हणजे पाकिस्तानी लष्कराला ७७ टक्के नागरिकांनी पसंती दिली आहे असेही या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे.

Leave a Comment