गर्भावस्था आहे तरूणींच्या मृत्यूचे सर्वात मोठे कारण

नवी दिल्ली, दि. २८ –  एक नवीन अहवालानुसार तरूणींच्या मृत्यूचे सर्वात मोठे कारण कमी वयात त्यांना गर्भ राहणे असते. `सेव द चिल्ड्रिन’ नावाच्या संस्थेच्या अहवालात सांगण्यात आले की, प्रस्तुती दरम्यान संक्रमण किंवा आजारामुळे १० लाख तरूणी बळी पडतात किंवा एकतर त्या कोणत्या ना कोणत्या कारणास्तव जखमी होतात.

या समस्येचे मोठे कारण गर्भनिरोधकापर्यंत पोहच नसणे, असे सांगण्यात आले.
जगातील अनेक देशात ही बाब सामन्य आहे की, मुलींचे कमी वयात विवाह होतात. विवाहानंतरच त्या नेहमी गर्भवती राहतात; परंतु शारीरिक रूपाने त्या बाळाला जन्म देण्यासाठी तयार नसतात.

लाइबीरियाचा एक गरीब भागातील क्लिनिकमध्ये एक तृतीयांश नवजात शिशुंच्या मातांचे वय १५ ते १९ वर्षादरम्यान असते. काहींचे वय तर १३ वर्षापर्यंतही असतात.

तेथे `सेव द चिल्ड्रन’ संस्थेचे प्रोजेक्ट मॅनेजर जॉर्ज किजाना म्हणतात की, कमी वयात माता बनणे या तरूणींमध्ये अनेक प्रकारची चिकित्सिक किचकटपणा निर्माण होऊ शकते. ते म्हणतात, `तरूणींचे शरीर तयार नसताना कमी वयात प्रस्तुती झाल्यामुळे अनेक प्रकारची शारीरिक समस्या निर्माण होऊ शकते. बाळाच्या प्रकृतीला देखील धोका असतो. जर माता १८ वर्षापेक्षा लहान असेल तर बाळाचा मृत्यु होण्याची शंका वाढते.‘

भारताची स्थिती
अहवालानुसार विकासनशील देशात ४० टक्के जन्म इच्छेशिवाय होतात. त्यांनी बाळाला जन्म घालायला हवा का? किंवा मग केव्हा व किती…. या प्रश्‍नावर निर्णय देणार्‍या लाखो महिला कुटुंब नियोजनाची सुविधा घेऊ शकत नाही. मोठी लोकसंख्या असणार्‍या देशात विशेषत: दक्षिण अशियात असे पहावयास मिळते. भारतात अशा ६.४ कोटी महिला असून पाकिस्तानमध्ये १.५ कोटी व बांगलादेशमध्ये एक कोटी महिला अशा आहेत. भारतात १५ ते १९ वर्षादरम्यान ४७ टक्के तरूणी सामान्यापेक्षा कमी वजनाच्या असून ५६ टक्के महिला रक्त हीनतेने ग्रस्त आहेत.

भारतात २००८ मध्ये झालेल्या एक सर्वेक्षणात आढळले की, १५ ते २४ वयादरम्यान तरूणींपैकी निम्म्यापेक्षा जास्त तरूणींने म्हटले की, त्यांना कोणतेही यौन-शिक्षण मिळाले नाही, ३० टक्के मुलींना कंडोमची माहिती नव्हती आणि ७७ टक्के मुलींनी म्हटले की, त्यांनी कधी कुणाशी गर्भनिरोधकाविषयी चर्चा केली नाही.

Leave a Comment