ऍडव्हर्टायझिंग एक्झिक्युटिव्ह

सध्याच्या जगामध्ये जाहिरातीची सर्व माध्यमे कमालीची विकसित होत आहेत. जाहिरातीचे महत्व वाढत आहे. म्हणून या क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधीही वाढत चाललेल्या आहेत. मात्र जाहिरात क्षेत्रात काम करण्यासाठी कल्पकतेची फार गरज असते. त्यामुळे आवश्यकतेपेक्षा कमी मनुष्यबळ उपलब्ध होते. उत्तम संवाद कौशल्य आणि ग्राहकांची मनोवस्था ओळखण्याचे कौशल्य अंगी असलेले तरुण या क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात. ग्राफिक डिझायनिंग, ऍनिमेशन ही कौशल्ये आत्मसात केलेल्या तरुणांना तर या क्षेत्रात चांगलाच वाव आहे.
मात्र ऍडव्हर्टायझिंग एक्झिक्युटिव्ह या पदावर काम करणार्‍यांना या कौशल्याशिवाय जाहिरात संस्था सांभाळणे आणि तिचा सर्व कारभार हाकणे याही कौशल्यांची गरज असते. अकौंटींग, प्रशासन आणि समुहाकडून काम करून घेण्याची हातोटी असणारा उमेदवार हे काम चांगले करू शकतो.

ऍडव्हर्टायझिंग एक्झिक्युटिव्ह होण्यासाठी मार्केटिंगचे ज्ञानही आवश्यक असते. व्यवस्थापन शास्त्रातील एमबीए डिग्री प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना हा रोजगार प्राप्त करता येऊ शकतो. मात्र त्यांचे स्पेशलायझेशन मार्केटिंगमध्ये झालेले असेल तर ऍडव्हर्टायझिंग कंपन्या अशा उमेदवारांना ऍडव्हर्टायझिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून प्राधान्याने नोकर्‍या देतात. असे असले तरी त्याला जाहिरातीचे आणि जाहिराती तयार करण्याचे ज्ञान असल्यास प्राधान्य दिले जाते. मात्र कोणत्याही व्यवस्थापनाच्या अभ्यासक्रमात हे ज्ञान समाविष्ट नसते. अशा उमेदवारांना ते अनुभवानेच प्राप्त करावे लागते. या व्यतिरिक्त केवळ जाहिरातीचे ज्ञान देणारे काही अभ्यासक्रम आता सरसकट सर्वत्र सुरू झाले आहेत. बी.ए. इन ऍडव्हर्टायझिंग असा बारावीनंतरच्या तीन वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमात जाहिरात क्षेत्राचे पूर्ण ज्ञान दिले जात असते. अशी पदवी देणार्‍या काही संस्था महाराष्ट्रात आहेत.

१) डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन जर्नालिझम, गोखले एज्युकेशन सोसायटी, नाशिक. २) सिद्धार्थ कॉलेज ऑफ आर्टस् ऍन्ड सायन्स, आनंद भवन, दादाभाई नौरोजी रोड, मुंबई ४००००१. ३) सोमय्या कॉलेज ऑफ आर्टस्, चर्नी रोड, भारतीय विद्याभवन जवळ, मुंबई या व्यतिरिक्त नरसीमोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडिज, मुंबई येथे एक वर्षाचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुद्धा उपलब्ध आहे.

Leave a Comment