आदर्श चौकशी आयोगासमोर विलासराव पुन्हा हजर

मुंबई दि.२७-  केन्द्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री व माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे बुधवारी पुन्हा आदर्श गैरव्यवहाराची चौकशी करणार्‍या आयोगासमोर साक्षीसाठी हजर राहिले.

विलासरावांनी मंगळवारी साक्ष देताना तत्कालिन महसूल मंत्री यास जबाबदार असल्याचे सांगून अशोक चव्हाण यांच्या कोर्टात चेंडू तटकावला होता.. आपल्याला अधिकार्‍यांनी योग्य माहिती दिली नसल्याचाही आरोप त्यांनी केला. विलासरावांवर आदर्श साठी जादा एफ एस आय दिल्याचाही आरोप आहे. विलासरावांनीच त्या संबंधी महसूल तसेच नागरी विकास विभागाला आदेश दिले होते असे सांगण्यात आले आहे.

मात्र मंगळवारी आयोगासमोर जे सांगितले त्याचाच विलासरावांनी बुधवारीही पुनरुच्चार केला.

Leave a Comment