अर्जुन तेंडुलकरचा १४ वर्षाखालील संभाव्य संघात समावेश

अर्जुन तेंडुलकरने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या पावलावर पाउल ठेवले असून मुंबई क्रिकेट संघाच्या १४ वर्षाखालील संभाव्य संघात त्याचा समावेश करण्यात आला आहे. या संघात निवड झालेल्या खेळाडूचे प्रशिक्षण शिबीर पुढील महिन्यात घेण्यात येणार आहे. १२ वर्षींय अर्जुन तेंडुलकर  डावखुरा फलंदाज व डावखुरा मध्यमगती गोलंदाज आहे.

काही दिवसापूर्वी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने उन्हाळी शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्या सामन्यामध्ये अर्जुनने चांगले प्रदर्शन केले होते. त्याने पाच सामन्यात २५० धावा केल्या होत्या. त्यासोबतच अर्जुने महिनाभरापूर्वी झालेल्या १४ वर्षाखालील खेळाडूच्या सामन्यात शतक ठोकले होते.

गेल्या वर्षी अर्जुनने पदार्पण करताना पुणे येथील मैदानावर ६५ धावाची उपयुक्त खेळी खेळली होती. अर्जुनने गोलंदाजीत ही उत्कृष्ठ कामगिरी करताना केवळ २२ धावा देऊन ८ बळी घेतले आहेत. अजून तो १२ वर्षाचा असला तरी तो खेळात परिपक्व झाला आहे. त्यामुळे भविष्यात तो एक चांगला व गुणी खेळाडू म्हणून पुढे येण्याची शक्यता असल्याचे मत त्याचा कोच सनिल याने व्यक्त केले आहे.

Leave a Comment