स्पेन युरो कपच्या फायनलमध्ये

युक्रेन, दि.२८ – पेनल्टी शूटआऊटमध्ये स्पेनने पोर्तुगालवर विजय मिळवत युरो कपची फायनल गाठली आहे. दोन्ही टीम निर्धारित वेळेत गोल करण्यास अपयशी ठरल्या. अखेर पेनल्टी शूटआऊटमध्ये ब्रुनो अल्वेसच्या हुकलेल्या पेनल्टीमुळं पोर्तुगालचा घात झाला आणि स्पेनने ४-२ ने पेनल्टी शूटआऊटमध्ये थरारक विजय मिळवला.

फायनलमध्ये स्पेनला अजिंक्य जर्मनी किंवा बलाढ्य अशा इटलीशी झुंज द्यावी लागणार आहे. सेमी फायनलच्या या मॅचमध्ये १२० मिनिटांचा खेळ होऊनही स्पेन आणि पोर्तुगालच्या दिग्गजांना एकही गोल करता आला नाही आणि सेमी फायनलची पहिलीच मॅच पेनल्टी शुटऑऊटमध्ये गेली. रोनाल्डो, नानी, जेराल्ड, फेब्रेगेस अशा सर्वांनीच अतोनात प्रयत्न केले. तरीही पहिल्या ९० मिनिटांत दोन्हीही टीम्स गोल करु शकल्या नाहीत. मॅच एक्स्ट्रा टाईममध्ये गेली. लीगमध्ये आपल्या रंगात आलेल्या रोनाल्डोची जादूही या मॅचमध्ये चालली नाही.

दोन्ही टीम्सला या मॅचमध्ये फ्री किक, कॉर्नर्स आणि यलो कार्डही मिळाले मात्र कशाच उपयोग झाला नाही आणि मॅच अखेर पेनल्टी शुटआऊटमध्ये गेली. पेनल्टीच्या पहिल्या प्रयत्नात पुन्हा स्पेन आणि पोर्तुगाल अपयशी ठरले. दुसर्‍या प्रयत्नात दोन्हीकडून एक-एक गोल झाला. तिसर्‍या शुटआऊटमध्ये स्पेनकडून जेराल्ड आणि पोर्तुगालकडून नानी गोल करत मॅच बरोबरीत ठेवली. चौथ्या शुटआऊटमध्ये पोर्तुगालच्या ब्रुनो अल्वेसला गोल करता आला नाही. फेब्रेगेसने स्पेनकडून पाचव्या शुटआऊटमध्ये गोल लगावला आणि स्पेनचा फायनलचा मार्ग मोकळा करुन दिला.

Leave a Comment