सैफ, करिनाच्या विवाहात विघ्न ?

मुंबई-नवी दिल्ली दि.२८ – मी भलेही सैफबरोबर लग्न करत असले, तरी मी माझा धर्म बदलणार नाही, असे अभिनेता सैफ अली खानच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या करिना कपूरने ठणकावून सांगितल्यामुळे या दोघांच्या प्रेमकहाणीत ट्विस्ट निर्माण झाला असल्याची चर्चा आहे. हा विवाहसोहळा हिंदू पद्धतीने होणार आहे, की मुस्लीम पद्धतीने हे अद्याप निश्चित नसले, तरी करिनाच्या या भूमिकेमुळे या दोघांच्या नातेसंबंधांवर कोणता परिणाम होईल, याकडे सर्वांचे डोळे लागले आहे.

लग्नानंतर मी माझे नाव आणि ओळख बदलणार नाही, असे तिने स्पष्टपणे सांगितले आहे. करिनाच्या या भूमिकेवर सैफनेही कोणतीही हरकत घेतली नसल्याची पुसटशी चर्चा आहे. मुस्लीम धर्म ही जर अडचण ठरत असती, तर धर्मपरिवर्तनाची अपेक्षा मीही केली असती. मात्र, माझा अशा कोणत्याही गोष्टींवर विश्वास नाही, असे तो म्हणाला.

सैफचा पहिला विवाह जेव्हा अमृतासिंह हिच्याशी झाला होता, तेव्हा तिला धर्म बदलावा लागला होता. अमृताला आपले नाव बदलावे लागले होते, असे समजते. सैफची आई आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री शर्मिला टागोरनेही मन्सूर अली पतोडीशी विवाह करताना धर्म बदलला होता.

Leave a Comment