शेव्हरोलेट कॅप्टीव्हाचे नवे व्हर्जन बाजारात दाखल

अमेरिकेतील अग्रणी कार उत्पादक कंपनी असलेल्या जनरल मोटर्सने त्यांच्या लोकप्रिय लक्झरी स्पोर्टस युटिलिटी व्हेईकल (एसयूव्ही) शेव्हरोलेट कॅप्टिव्हाचे नवे व्हर्जन भारतीय बाजारात आणले असून त्याची सुरवातीची किंमत १८ लाख ७४ हजार रूपये आहे.

या संबंधी अधिक माहिती देताना कंपनीचे भारतातील अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लॉवेल पॅडॉक म्हणाले की भारतीय ग्राहकांनी आमच्या कॅप्टिव्हाला चांगला प्रतिसाद दिला आहे. नवीन व्हेरिएंटला २.२ एल इंजिन असून ते अतिशय पॉवरफुल आहे. या व्हेरिएंटच्या किमती १८ लाख ७४ हजार पासून २४ लाख ५९ हजारांच्या दरम्यान आहेत. पाच अधिक दोन सीटची यात व्यवस्था असून सामान नेण्यासाठीही प्रशस्त जागा आहे. सहा एअरबॅग्जसह अन्य अनेक सुविधा या गाडीत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

Leave a Comment