युरो कप – जर्मनी-इटलीमध्ये आज दुसरी सेमी फायनल

वार्सा दि.२८ – विजयाची प्रबळ दावेदारी मानली जाणारी जर्मनी आणि इटलीमध्ये दुसरी सेमी फायनल रंगणार आहे. आता सर्वाधिक वेळा युरो कपचे विजेतपद पटकावलेली जर्मनी की याआधी जर्मनीला सर्वाधिक वेळा पराभूत करणारी इटली फायनल गाठते हे पाहण रंजक ठरणार आहे.

आतापर्यंत स्पर्धेत अपराजित राहिलेल्या जर्मनीचा धडाका पाहता इटलीसमोर जर्मनीचे कडवे आव्हान असणार आहे. मात्र इतिहासावर नजर टाकल्यास इटलीने जर्मनीला सर्वाधिक वेळा पराभूत करण्याची किमया केली आहे.

जर्मनी आणि इटली आतापर्यंत ३० वेळा आमने-सामने आले आहेत. यामध्ये सर्वाधिक १४ वेळा इटलीने विजय मिळवला आहे. तर जर्मनीला केवळ ७ वेळाच विजय मिळवता आला आहे. तर ९ वेळा मॅच ड्रो झाली आहे.

जर्मनीची टीम विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानली जात आहे. जर्मनीकडून सर्वाधिक ३ वेळा गोल करणारा मॅरिओ गोम्स, लुकास पोडोलोस्की आणि मिरोस्लॉव हे जर्मनीचे आधारस्तंभ आहेत. तर इटलीची सारी मदार ही मिडफिल्डर एँडे पिर्लोवर असेल. पिर्लो आणि गोलकिपर बफॉन ही इटलीची ताकद आहे.
आघाडीचा मारिओ बालोटेल्ली मिडफिल्डर मोंटोलिव्हो, मॅर्शिसिओ दियामंती हे समीकरण जुळून आल्यास ते जर्मनीलादेखील पराभवाचा धक्का देऊ शकतात.

Leave a Comment