भ्रष्टाचारप्रकरणी झरदारी अडचणीत

इस्लामाबाद दि. २७ – पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांच्याविरोधातील भ्रष्टाचाराचा खटला पुन्हा सुरु करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने नव्या पंतप्रधानांना दिले आहेत. पंतप्रधान राजा परवेझ अश्रफ यांना १२ जुलैपर्यंत यासंदर्भातील खटला पुन्हा सुरु करण्यासाठी मुदत देण्यात अली आहे.

झरदारी यांना २००३ मध्ये ६० दशलक्ष डॉलर्सचा भ्रष्टाचार केल्याचा प्रकरणात ठरविले होते. परंतु, त्यानंतर कोणतीही कारवाई झाली नाही. माजी पंतप्रधान युसुफ रझा गिलानी यांना सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. स्वित्झर्लंडच्या अधिकार्‍यांना पत्र लिहून झरदारी यांच्या प्रकरणाची फाईल उघडण्यासाठी पत्र लिहीण्यास गिलानी यांना सांगण्यात आले होते.

Leave a Comment