क्रेडीट कार्डची माहिती विकणार्‍यांवर एफबीआयचा अंकुश

लंडन, दि. २८ – गैर-कायदेशीर पद्धतीने क्रेडिट कार्डची माहिती विकणार्‍यांवर अंकुश कसून अमेरिकेच्या नेतृत्वात १३ देशात केलेल्या एक स्टिंग ऑपरेशनमध्ये २४ लोकांना अटक करण्यात आले. हे पाऊल चार महाद्वीपच्या अनेक देशात दोन वर्षे चाललेल्या एफबीआयच्या चौकशीनंतर उचलण्यात आला आहे. `ऑपरेशन कार्ड शॉप’ नावाच्या या ऑपरेशनमध्ये एफबीआयचे बनावट ऑनलाईन फोरमच्या मदतीने त्या लोकांपर्यंत पोहचले गेले. जे अशी माहिती खरेदी किंवा विकत होते. यापैकी १२ जणांना अमेरिकेत तर सहा लोक ब्रिटेनमध्ये अटक केले.

या सर्वांचे वय १८ ते २५ वर्षादरम्यान आहे. जर हे लोक फसवेगिरीशी संबंधित गुन्हेगारीत दोषी आढळले, तर त्यांना ४० वर्षापर्यंत शिक्षेचा सामना करावा लागेल. यापैकी  मीर इस्लामला ऑनलाईनवर `जोश द गॉड’ नावाने ओळखला. त्याविरूद्ध ५०,००० चोरीच्या नंबरांची खरेदी करण्याचा आरोप लावण्यात आला. एकंदरीत तपासकर्त्यांनी क्रेडिट कार्ड देणार्‍यांना चार लाखपेक्षा जास्त चोरी केलेल्या खात्याविषयी अवगत केले. अमेरिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, या ऑपरेशनने २०.५ कोटी डॉलरचा नुकसान वाचवला गेला. तपासकर्त्यांनी कथित गुन्हेगारांना अमेरीका, आशिया, यूरोप व ऑस्ट्रेलियात धरले. एक वक्तव्यात अमेरिकेचे अटॉर्नी प्रीत भरारा म्हणाले, `कायद्याचे लांब हात इंटरनेटच्या पडद्यामागे लपलेले संगणकाचे चालाक गुन्हेगारांपर्यंत पोहचु शकते.’

Leave a Comment