इंग्लंड बोर्डामुळेच दिला पीटरसनने राजीनामा

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या अहंकारीपणामुळे केविन पीटरसनला एकदिवसीय व ट्वेंटी २० संघातून राजीनामा द्यावा लागला आहे असा आरोप ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू शेन वार्न यांनी केला आहे.  

केविन पीटरसन आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकदिवसीय सामन्यातून निवृत्ती घेण्याचा विचारात होता.  मात्र त्याने एकदिवसीय व ट्वेंटी २० संघातून राजीनामा द्यावा यासाठी त्याला इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने प्रवृत्त केले आहे. इंग्लंड बोर्डाने  ट्वेंटी २० व एकदिवसीय या दोन्ही संघात खेळायचे नसेल तर दोन्ही प्रकारच्या संघात  खेळू नये असा पर्याय त्याच्यासमोर ठेवला होता. पीटरसन हा आगामी काळात श्रीलंकेत होणाऱ्या ट्वेंटी २० संघात खेळणार नाही. त्याशिवाय त्यानंतर होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणाऱ्या इंग्लंड संघातही तो नसणार आहे. त्यामुळे इंग्लंडचा संघ दुबळा झाला आहे.

शेन वार्न म्हणला की , धडाकेबाज फलंदाज असलेला केविन पीटरसन नसल्याने इंग्लंडचा संघ खूपच कमजोर झाला आहे. काही दिवसापासून इंग्लंड संघाची ओळख विजेता संघ अशी झाली होती. त्यामधील कित्येक सामन्यात पीटरसनने मोलाची कामगिरी केली होती. त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या. इंग्लंड संघाचा कणा असलेल्या केविन पीटरसनला वगळून इंग्लंड संघाने काय साध्य केले हे समजत नसून याचा फटका त्यांना आगामी काळात बसणार आहे

Leave a Comment