फॉक्सवॅगन जेटा आता पेट्रोल मॉडेलमध्ये

नवी दिल्ली, दि. २८ – जर्मन कार उत्पादक कंपनी फॉक्सवॅगनने आता सेदान जेटाचे पेट्रोल वॅरियंटस मॉडेल बाजारात लॉंच केले आहे. दिल्लीमध्ये या मॉडेलची एक्स शोरूम किंमत १३.६०-१५.०७ लाख रूपये आहे. १.४ लीटर इंजिन क्षमता असलेले कंपेक्ट जेटा सेदान लॉंच करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. नव्या कारमुळे कंपनीचा प्रॉडक्ट पोटफोलियो आणखी मजबूत झाला आहे.

यापूर्वी कंपनी भारतात जेटाचे डिझेल वॅरियंटसची विक्री करत असत. दिल्लीमध्ये कंपनीने जेटा डिझेल वॅरियंटसची एक्स शोरूम किंमत १४.९३-१८.९० लाख रूपये आहे.