स्त्रीभ्रूण हत्या : उज्जवल निकमांची विशेष सरकारी वकील म्हणून निवड

परळी, २७ जून-परळीतल्या स्त्रीभ्रूण हत्येप्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या विधी आणि न्याय विभागाच्या शिफारसीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

उज्ज्वल निकम यांची कारकीर्द पाहता त्यांनाच हा खटला सोपवला जावा अशी शिफारस विधी आणि न्याय विभागाने आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांच्याकडे केली होती.

बेकायदेशीर लिंगनिदान चाचणी करुन गर्भपात केल्या प्रकरणी डॉ. सुदाम मुंडे आरोपी असून त्याची पत्नी डॉ. सरस्वती मुंडे हिला सहआरोपी करण्यात आले आहे. मुंडे दाम्पत १७ जून रोजी परळीच्या पोलिसांना शरण आले होते.

Leave a Comment