लंडन ऑलिम्पिक दहशतवाद्यांचा निशाण्यवर!

नवी दिल्ली,२७जून-दहशतवादी संघटना लंडन ऑलिम्पिकवर हल्ला करण्याचा कट रचत आहे. ही शंका ब्रिटिश गुप्त संस्था एमआय-५ ने वर्तवली आहे. एमआय-५ प्रमुखाने एक वक्तव्यात सांगितले की, पुढच्या महिन्यात लंडनमध्ये होणार्‍या ऑलिम्पिक खेळावर दहशतवादी हल्ला करू शकतात. एमआय-५ प्रमुखांनी दोन वर्षात पहिल्यांदा लंडनमध्ये सार्वजनिक भाषण दिले.

गुप्त सूत्राकडून ही माहिती मिळाली की, दहशतवादी या खेळादरम्यान आपल्या कुट कृत्याची अंमलबजावणी करु शकतात. तसेच ब्रिटेनमध्ये मागील दशकाच्या काही घटनांना दृष्टिगत करू हल्ल्यावर दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. आता जेव्हा की, गुप्त सूत्राने ही माहिती दिली की, त्याला सुरक्षेचे कडक बंदोबस्त करण्यासाठी ब्रिटिश पोलिसांना सावधान रहावे लागेल.

लंडनमध्ये एमआय-५ चे प्रमुख जोनाथन इवासने आपल्या एक टिप्पणीत लार्ड मेयर वार्षिक सुरक्षा व सुरक्षा व्याख्यानादरम्यान सांगितले की, आमचे आकलन आहे की, ब्रिटेनने दहशतवादी घटनेच्या कटाला ९-११ हल्ल्यानंतर पुन्हा एकदा सहन केले. अशात या प्रकरणावर कदापी दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही.

त्यांनी म्हटले की, ऑलिम्पिक खेळाचे स्थळ आमच्या शत्रूंसाठी सोपे ध्येय आहे. एक-दोन महिन्यादरम्यान हे स्थळ जगभराच्या दृष्टीत राहील. परंतु या स्थळावर हल्ला करणरे कदापी सोपे राहणार नाही. वास्तविकता ही आहे की, आम्ही अनेक दहशतवादी कट विफळ केले. अशात ब्रिटेनमधील दहशतवाद्यांसाठी एखाद्या कटाची अंमलबजावणी करणे कदापी सोपे राहणार नाही.

ओसामा गेल्यामुळे धोका टळला नाही
एमआय-५ प्रमुख जोनाथन इवास म्हणाले की, त्यांनी हा विचार करून नये की, ओसामा बिन लादेन ठार झाल्यानंतर दहशतवादाचा धोका समाप्त झाला आहे. ब्रिटेनमध्ये अशा लोकांची कमरताता नाही जे दहशतवादी हल्ले करू इच्छितात. अगोदर दहशतवादाशी संबंधित ७५ टक्के घटनांचे संबंध पाकिस्तान किंवा अफगानिस्तानशी होत होते परंतु आता अशा घटना ५० टक्केपेक्षा कमी झाल्या आहे.

Leave a Comment