_0.jpg)
पेण,२७जून-महाराष्ट्राचे लाडकं दैवत म्हणजे गणपती बाप्पा…गणपतींचे आगमन होण्यास आणखी तीन महिने अवकाश असला तरी रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये बाप्पांच्या परदेशवारीसाठी लगबग सुरू झाली. पेणमधील गणपतींच्या मूर्तींना अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंडसह अनेक देशांमधून मोठी मागणी असते. रायगडमधील पेण शहर गणपती बाप्पांचे घर म्हणून ओळखले जाते.