ऍण्ड्रॉइडसाठी फायरफॉक्सचे नवे ब्राउझर

नवी दिल्ली, दि. २८ –  इंटरनेट सर्फिंग करण्यासाठी आघाडीवर असलेल्या मोझिला फायरफॉक्सने संगणक व मोबाईधारकांसाठी नवीन ब्राउझर उपलब्ध करून दिला आहे. स्मार्टफोनमधील ऍण्ड्रॉइड आणि एचटीएमएल ५ ला हे ब्राउझर सपोर्ट करणारे असेल, असे कंपनीतर्फे सांगण्यात आले. या नवीन ब्राउझरमुळे चांगला स्पीड मिळण्यास मदत होणार आहे.

फायरफॉक्सचे जुने २.१ व्हर्जन ही जुनी प्रणाली असलेल्या मोबाईलना सपोर्ट करू शकत होती. मात्र, तंत्रज्ञानातील नवनवीन आविष्कारांमुळे नव्याने बाजारात आलेल्या स्मार्टफोनसाठी ते निरुपयोगी ठरले होते. हा नवीन ब्राउझर ऍण्ड्रॉईड स्मार्टफोनमधील २.२ व्हर्जनच्या पुढील सर्व प्रणालींमध्ये चालू शकेल, असे कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.

ऍण्ड्रॉईल सिस्टिम असलेल्या मोबाईलमध्ये फायरफॉक्सचा जुना ब्राउझर हाताळताना मोबाईलधारकांना विविध प्रकारच्या अडचणी येत होत्या. विशेष म्हणजे मोबाईलला स्पीड मिळत नव्हता. त्यामुळे अनेकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते. परंतु, नवीन ब्राउझरमुळे चांगला स्पीड मिळण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे हा ब्राउजर फ्लॅश सपोर्ट करणारे असल्याने, युजर व्हिडिओही सहजपणे पाहू शकतील. परिणामी यूट्यूबसह अन्य संकेतस्थळांवरील इतर व्हिडिओही पाहता येणार आहेत. शिवाय, सर्च करण्यासाठी एक खास पर्यायही देण्यात आला आहे.

Leave a Comment