नवी दिल्ली,२७जून-तुम्हाला कधी वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्यावर ट्रॅफिक पोलिसांनी धरले का? नेहमी तुम्हाला माहित असते की, कोणते नियम तोडल्यावर किती दंड द्यावा लागेल आणि तुम्हाला अनाधिकृतपणे १०० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त पैसे देऊन सुटका करणे चांगले वाटते.
आता असे करावे लागणार नाही कारण बाजारात एक असे आण्ड्रोएड अॅप्लीकेशन आले आहे जो तुम्हाला हे सांगेल की, ट्रॅफिक नियमाचे उल्लंघन केल्यावर किती दंड द्यावा लगोल. या अॅप्लीकेशनद्वारे तुम्हाला दोन चाकी व चार चाकी दोन्ही प्रकारच्या वाहनाशी संबंधित दंड, संबंधित सेक्शन, त्या भागाचे एसीपी (ट्रॅफिक) व कंट्रोल रूमचा नंबर फक्त एकदा क्लिक केल्यावर मिळू शकते.
ट्रॅफिक फाइन्स इंडिया नावाच्या या अॅप्लीकेशनमध्ये दिल्ली, बंगळुरू, चेन्नई व हैद्राबाद सारख्या सर्व प्रमुख शहरातील ट*ॅफिक नियमाची माहिती उपलब्ध आहे. येथे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या ट्रॅफिक गुन्हेगारीविषयी पूर्ण माहिती मिळेल आणि हे देखील कळेल की, त्यासाठी किती दंड द्यावा लागेल.
या अॅप्लीकेशनची सर्वात चांगली विशेषता ही आहे की, हे ऑफलाइन देखील अॅक्सिस होऊ शकते. याला डाउनलोड करण्यासाठी तुहाला गूगल प्ले वर जावे लागेल, तेथे तुम्ही सर्च करून या अॅप्लीकेशनविषयी माहिती प्राप्त करू शकता आणि डाउनलोड देखील करू शकताल.
नेहमी लोक माहिती अभावी टॅफिक सार्जेंटला दंडाच्या रक्कमेसंदर्भात बरोबरच पैसे देऊन सेटलमेंट करतात. त्यांना नंतर कळते की, ते तीच रक्कम सरकारी खात्यात जमा करून सुटू शकत होते.