सचिन तेंडुलकर हा क्रिकेटमधला सर्वोत्तम फलंदाज – डेनिस लिली

चेन्नई – सचिन तेंडुलकर हा क्रिकेटमधला सर्वोत्तम फलंदाज असल्याचे मत ऑस्ट्रेलियाचे महान गोलंदाज डेनिस लिली यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले. सचिन हा अतिशय शांत स्वभावाचा खेळाडू आहे. तो क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज आहे. त्याची खेळाविषयीची ओढ, त्याचे खेळावरचे नियंत्रण या सर्व गोष्टींमुळेच त्याने आपल्या खेळामध्ये इतके वर्ष सातत्य राखले आहे. एमआरएफ फाउंडेशन मध्ये २५ वर्षे काम केल्यानंतर निवृत्त झालेल्या ६५ वर्षीय लिलीने आपली मते मुक्तपणे व्यक्त केली.

सचिनची १९८० व्या दशकाच्या शेवटच्या टप्प्यात गोलंदाज होण्याची इच्छा होती. मात्र लिलींनी त्याची गोलंदाज म्हणून निवड केली नाही. सचिनने क्रिकेट या खेळाला एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवले आहे, असे ते म्हणाले. जलदगती गोलंदाज होण्याची इच्छा बाळगून सचिन लिलींकडे एमआरएफ फाउंडेशनमध्ये आला होता.

`खरे तर त्याला आपली निवड न झाल्याची खंत वाटत होती, पण आपण जे केले ते क्रिकेटच्या पथ्थ्यावरच पडले, असे लिली यांनी मिश्किलपणे सांगितले. मात्र आपण सचिनसोबतचची ती भेट विसरु शकत नाही,’ असे डेनिस म्हणाले. त्यावेळी गोलंदाजी ऐवजी फलंदाजीवर लक्ष केंद्रात करण्याचा सल्ला लिली यांनी सचिनला दिला होता. जेव्हा वर्षभरानंतर त्याला नेटमध्ये फलंदाजीचा सरावा करताना पाहिले, तेव्हा तो १५ वर्षाचा होता. गोलंदाजांना कळत नव्हते की, त्याला चेंडू कोठे टाकायचे. तो सर्व प्रकारचे चेंडू सहजरित्या सीमारेखेबाहेर भिरकावत होता, असे डेनिस यांनी आर्वजून नमूद केले.

Leave a Comment