शेरील फेसबुकची पहिली महिला संचालक

 न्यूयॉर्क, दि. २६- फेसबुकमध्ये सध्या मार्क झुकेरबर्गनंतर दुसर्‍या स्थानावर असलेली एक्सिक्युटिव्ह शेरील  फेसबुक या सोशल नेटवर्किंग कंपनीची पहिली महिला संचालक म्हणून नियुक्त झाली आहे. `गुगल’ या जगप्रसिद्ध सर्च इंजिन कंपनीतून फेसबुकने शेरील हिला २००८ साली मुख्य ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून उचलले होते. आता तिला संचालक मंडळावर घेतल्याने या पदावर नियुक्त होणारी ती पहिली महिला ठरली आहे.  फेसबुकचा पब्लिक इश्यू येण्यापूर्वीच अनेक ग्राहकांनी फेसबुकच्या संचालक मंडळावर महिला घेतली जावी अशी मागणी केली होती. त्यानुसार सोमवारी मार्क झुकेरबर्ग यांनी ही घोषणा केली आहे.

मार्क या विषयी बोलताना म्हणाला की अगदी सुरवातीपासूनच शेरील आमच्यासाठी महत्त्वाची ठरली असून फेसबुकच्या वाढीत तिचाही सहभाग मोठा आहे. आमच्या यशात तिचा वाटा आहेच. आमचा जाहिरात व्यवसाय विभाग तिने उत्तम रितीने सांभाळला तसेच आमच्या कंपनीची पब्लिक फेस म्हणूनही तिने कामगिरी बजावली आहे. तिचा अनुभव मोठा असून कंपनीसाठी अनेक परिषदा, बैठका तिने यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत.

शेरील वॉल्ट डिस्नेच्या संचालक मंडळावरही आहे तसेच वुमन फॉर वुमन इंटरनॅशनलच्याही संचालक मंडळावर ती काम करते आहे.

Leave a Comment