भारताचे मानांकन स्थिरच – मुडीजचा दिलासा

नवी दिल्ली, २६ जून-भारताचा आर्थिक विकास मंदावला असला तरी आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्था मुडीजने भारतासाठी स्थिर पतमानांकन कायम ठेवला आहे. यामुळे पतमानांकन संस्थांनी एकामागोमाग पतमानांकन कमी करण्याच्या झपाट्यात मुडीजकडून दिलासा मिळाला आहे.

निराशजनक आर्थिक कामगिरी, चलनवाढीसंबंधीचा दृष्टिकोन आणि अनिश्चित गुंतवणूक धोरण यांसारखी अनेक आव्हाने गेल्या दशकभरात भारतीय अर्थव्यवस्थेसमोर आहेत. असे असले तरी या सर्वाचा सध्याच्या ‘बीएए ३’ मानांकनामध्ये समावेश आहे. यामुळे भारताचे स्थिर मानांकन स्थिरच ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे मुडीज इन्व्हेस्टर्स सवषर्हसने म्हटले आहे.

दुसरीकडे, मंदावलेला विकास, कमी झालेली गुंतवणूक आणि निराशाजनक व्यावसायिक वातावरण यांसारखे नकारात्मक बाबी असल्या तरी त्या फारकाळ टिकणार नाहीत, असेही मुडीजने म्हटले आहे. असे असले तरी जागतिक आणि देशांतर्गत घटकांमुळे पुढच्या काही तिमाहींमध्ये देशाचा विकास अपेक्षेपेक्षा कमीच होईल. यामध्ये कृषी क्षेत्राकडून मोठा फटका असण्याची शक्यता असल्याचे मुडीजने अंदाज वर्तवला आहे.

२०११-१२ या वर्षामध्ये एकूण देशांतर्गत उत्पादनाचा (जीडीपी) दर ६.५ टक्क्यांपर्यंत मंदावला आहे. आधीच्या दोन वर्षामध्ये जीडीपी ८.४ टक्के या दराने वाढला होता. चालू आर्थिक वर्षामध्ये जीडीपीचा विकास ७.६ टक्क्यांनी होण्याचा सरकारचा अंदाज आहे. नुकताच आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्था स्टँडर्ड अँड पुअर्स आणि फिचने देशाचे पतमानांकन नकारात्मक केले होते. या पार्श्वभूमीवर मुडीजच्या भारतीय अर्थव्यवस्थेविषयरचा देशाच्या अर्थव्यवस्थेविषयीचा अंदाज मोठा दिलासा देणारा ठरला आहे.

रुपयामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे. मात्र, यामुळे सरकारवरचा कर्जफडीचा भार विशेष वाढणार नाही. कारण सरकारचे परकीय चलनामध्ये जे कर्ज आहे ते बहुपक्षीय आणि द्विपक्षीय कर्जदारांकडून ठरावीक वार्षिक कर्जफेडीच्या बोलीवर घेतले असल्याचे मुडिजने नमूद केले आहे.

Leave a Comment