केंद्रीय मंत्री वीरभद्र यांचा राजीनामा

नवी दिल्ली दि. २६ – भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली यूपीएच्या आणखी एका मंत्र्यावर पद गमावण्याची वेळ आली आहे. लघु आणि कुटीर उद्योग मंत्री आणि हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी आपल्या केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.

सिमल्याच्या एका न्यायालयाने सोमवारी वीरभद्र सिंह यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप निश्चित केले. त्या नंतर वीरभद्र सिंह यांनी मंगळवारी पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाऊन आपला राजीनामा मनमोहन सिंह यांच्याकडे सोपवला, वीरभद्र यांचा राजीनामा पंतप्रधानांनी स्वीकारला आहे.

वीरभद्र सिंह यांनी याआधी न्यायालयाच्या कारवाईच्या फेर्‍यात आल्यानंतर सोनिया गांधी यांच्याशी सोमवारी चर्चा केली होती. वीरभद्र सिंह आणि त्यांची पत्नी प्रतिभा सिंह यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप सिमलाच्या स्पेशल व्हिजिलन्स जज बीएल सोनी यांनी निश्चित केले आहेत. हे प्रकरण २४ वर्ष जुने आहे. वीरभद्र सिंह १९८९ मध्ये मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी लाच घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

Leave a Comment