सॅमसंगच्या गॅलेक्सी थ्रीएसचा वारू धावतोय जोरात

बाजारात येऊन दोन महिनेच उलटत आहेत तोपर्यंतच सॅमसंगच्या गॅलॅक्सी थ्री-एसची जुलै अखेरीपर्यंतची विक्री १ कोटी स्मार्टफोनचा टप्पा ओलांडेल असा विश्वास कंपनी अधिकारी व्यक्त करत आहेत. स्मार्ट फोनची जगातील सर्वात मोठी दक्षिण कोरियन कंपनी ठरलेल्या सॅमसंगने ही घोषणा सोमवारी केली आहे.

याविषयी अधिक माहिती देताना कंपनीच्या मोबाईल कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख व्ही.के.शिन म्हणाले की आमच्या या नव्या स्मार्टफोनची विक्री सध्या जगभरातील  १४७ देशात सुरू असून आम्हाला चांगले रिव्हूही आले आहेत. गॅलेक्सी एक्स वन व टू पेक्षाही गॅलॅक्सी एस थ्री ला युरोप, मध्यपूर्व तसेच दक्षिणपूर्व आशियात प्रचंड मागणी आहे. त्यामुळेच जुलैअखेर आमचे १ कोटी सेट विकले गेलेले असतील याचा विश्वास वाटतो आहे. पहिल्या तिमाहीच्या तुलनेत दुसर्‍या तिमाहीत आमचा नफाही चांगलाच वाढला असून त्यामागे गॅलॅक्सी एसथ्रीची वाढलेली विक्रीच प्रामुख्याने कारणीभूत आहे. विशेष म्हणजे युरोपात आर्थिक मंदी असूनही आमचा नफा वाढला आहे. सर्व विभागात मिळून कंपनीला तिमाहीत ४.४४ बिलीयन डॉलर्स इतका नफा मिळाला आहे.

कंपनीने पेटंट संबंधीचे दावे जिंकल्याने कंपनीचा आत्मविश्वास वाढला आहे असे सांगून शिन म्हणाले की आयफोन पाच येण्यापूर्वीच त्यांचा मार्केट शेअर काबीज करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

Leave a Comment