मंत्रालयात तळ मजला ते तिसर्‍या मजल्यापर्यंतच्या कार्यालयातील कामकाज आजपासून सुरु

मुंबई,२५ जून-मंत्रालय इमारतीस लागलेल्या भीषण आगीमुळे मंत्रालयीन प्रशासकीय विभागाचे कामकाज बंद होते. या इमारतीतील तळ मजला ते तिसरा मजल्यांच्या जमिनीवरील पाणी कचरा काढण्यात आला असून प्रशासकीय कामकाजासाठी सर्व यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मजल्यावरील कार्यालयातील कामकाज उद्या दिनांक २५ जून पासून सुरु करण्यात येणार आहे.

मंत्रालयीन कामकाज पार पाडण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने आपल्या विभागाचे संफ कार्यालय जनता जनार्दन द्वार (जे.जे.गेट) येथील शेडमध्ये रविवार दिनांक २४ जून रोजी दु.३.०० वाजेपर्यंत सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानुसार माहिती व जनसंफ महासंचालनालय, मराठी भाषा विभाग, विधी व न्याय, वित्त, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य, नियोजन, शालेय शिक्षण व क्रिडा, गृहनिर्माण, कृषि व पदुम, जलसंपदा, पाणीपुरवठा व स्वच्छता, ग्रामविकास व जलसंधारण, गृह (परिवहन व बंदरे), उद्योग, ऊर्जा व कामगार या विभागांचे संफ कक्ष आजपासून उघडण्यात आले आहे. या संफ कक्षात क्षेत्रिय कार्यालय तसेच इतर सर्व मार्गाने प्राप्त होणारे टपाल स्वीकारले जाईल तसेच येणार्‍या अभ्यागतांना आवश्यक ती माहिती संफ अधिकार्‍यांमार्फत दिली जाईल.

त्याचबरोबर राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष सेल तयार करण्यात येणार आहे. यासाठी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व जिल्हाधिकार्‍यांशी संफ साधून जनतेशी संबंधीत असलेल्या आगीत नष्ट झालेल्या नस्ती संदर्भात तातडीने विशेष सेल तयार करुन कार्यवाही करावी असे निदेश सर्व जिल्हाधिकार्‍यांना दिले.

Leave a Comment