’पतीच्या चारित्र्यावर संशय घेणे क्रूरतेच्या श्रेणीत’

मुंबई,२५ जून-पतीच्या चारित्र्यावर बोट दाखविण्यावर मुंबई उच्च न्यायालयाने कडक शब्दांत टिप्पणी केली आहे. न्यायालयाने ही बाब क्रूरतेच्या श्रेणीत ठेवताना तलाकसाठी पुरेसा असल्याचे सांगितला आहे. न्यायालयाने हा निकाल पतीची तलाक याचिका स्वीकारताना दिला. त्याचबरोबर पती आणि त्याच्या बहिणी (नणंद) यांच्यात अनैतिक संबंध असल्याचा आरोप करणार्‍या महिलेची चांगलीच खरडपट्टी काढली.

न्यायमूर्ती ए.आर. जोशी आणि ए.एम. खानविलकर यांच्या खंडपीठाने २१ जून रोजी आदेश दिला की, ’ आमही कौटुंबीक न्यायालयाचा घटस्फोट आदेश कायम ठेवण्याबाबत सहमत आहोत. पत्नी द्वारा पतीवर लावलेले आरोप, क्रूरतेच्या श्रेणीत येतात. त्यामुळे तलाकची डिक्री दिली जात आहे. दरम्यान उच्च न्यायालयाने तो आदेश खारिज केला ज्यात कौटुंबीक न्यायालयाने महिला व तिची मुलीला पोटगी मिळण्याची याचिका फेटाळली होती.

न्यायालयाने म्हटले की, हे योग्य नाही आणि ते योग्य प्रकारे हाताळले गेले नाही. उच्च न्यायालयाने महिला व तिच्या मुलीला कौटुंबीक न्यायालयासमक्ष नव्याने पोटगीसाठी याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले.
पतीला लिहिलेले पत्र आणि कौटुंबीक न्यायालयापुढे तोंडी पुरावे, वाद विवादादरम्यान महिलेने आरोप लावला होता की तिच्या पतीचे आपल्या बहिणीशी अनैतिक संबंध आहेत.

Leave a Comment