ई-शॉपिंगच्या व्यवहारवर प्राप्तिकर विभागाची नजर

मुंबई दि.२५- ऑफिसमध्ये बसल्याजागी एखाद्या संकेतस्थळावरून काही खरेदी केले, किवा ब्लॅकबेरी वर्ल्डवरून एखादे अॅप्लिकेशन पैसे देऊन डाऊन लोड केले तर, त्याचे तपशील नीट जपून ठेवा..अन्यथा कधीही प्राप्तीकर विभागाची नजर तुमच्यावर पडू शकते.
 
गेल्या दोन वर्षांत ई-शॉपिंगच्या व्यवहारांत अब्जावधी रुपयांची उलाढाल झाली आहे. तर, मोबाईलच्या माध्यमातूनही इंटरनेट सर्रास वापरले जाते. विशेष म्हणजे, विविध हँडसेट निर्मात्या कंपन्यांनी स्वतःच्या ई-कॉर्मस साईट सुरू केल्या आहेत.  विशेष म्हणजे, हे व्यवहार इंटरनेटवरून होत असल्याने कोणत्याही देशातून खरेदीविक्री करणे शक्य होते.क्रेडिट अथवा डेबिट कार्डावरून किंवा प्रीपेड कार्डावरून हे व्यवहार होतात. मात्र, संकेतस्थळावरून होणार्‍या व्यवहारांमुळे कराचे संकलन करताना सरकारला त्रास पडत आहे.
 
किंबहुना, अनेकवेळा कर चुकविण्याचेही प्रकार होत असल्याचे प्राप्तिकर विभागाच्या लक्षात आले आहे. त्यामुळे आता या व्यवहारांवर लक्ष ठेवण्याकरिता प्राप्तिकर विभागाने विशेष टीम तयार केली आहे.

Leave a Comment