एकदिवसीय क्रमवारीत धोनीची घसरण

दुबई,२५ जून-आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने रविवारी जाहीर केलेल्या नव्या क्रमवारीत भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी एका स्थानाने घसरण झाली आहे. तर विराट कोहीली मात्र तिसरे स्थान कायम राखले आहे.

धोनी आणि इंग्लंडचा एदिवसीय क्रिकेट सामन्यातील कर्णधार अॅलस्टेर कुक या दोघांचे ७५२ गुण झाले आहेत. दोघेही पाचव्या स्थानावर आहेत. तर दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हाशीम आमला ८७१ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. विराट ८४६ गुणांसह तिसर्‍या स्थानावर आहे. पहिल्या २०मध्ये गौतम गंभीर ६६६ गुणांसह १७व्या स्थानावर आहे.

गोलंदाजांमध्ये आर.अश्विन ६७६ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. एकदिवसीयक क्रमवारीत भारतीय संघ ११७ गुणांसह तिसर्‍या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलिया १२३ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका (११८) दुसर्‍या स्थानावर आहे. इंग्लंड आणि श्रीलंका चौथ्या स्थानावर आहेत. (प्रत्येकी ११२ गुण)