अमरनाथने झेलले होते ८० बाऊन्सर

२५ जून म्हणजेच आजचा दिवस  भारतीय क्रिकेटच्या इतिहासात कोणीच विसरू शकत नाही असा दिवस आहे. कारण सुमारे २९ वर्षापूर्वी आजच्या दिवशीच भारतीय क्रिकेट संघाने पहिल्यांदा वेस्टइंडीज संघाला पराभूत करून वर्ल्डकप जिंकला होता.

कपिल देवच्या नेतृत्वाखाली भारतीय सेनेने क्रिकेट क्षेत्रातील दबंग संघ समजल्या जाणाऱ्या वेस्टइंडीजला धूळ चारून वर्ल्ड कप जिंकला होता. यानंतर नुकताच २०११ साली भारतीय संघाने कर्णधार धोनीच्या नेत्तृत्वखाली दुसऱ्यादा विश्वचषक जिंकला आहे.

या रोमांचकारी सामन्यात वेस्टइंडीज संघाने भारतीय संघाच्या फलंदाजीला सुरुंग लावला होता. केवळ के. श्रीकांतने ३८ तर संदीप पाटीलने २७ धावा केल्या होत्या. त्यांच्या फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने १८३ धावा केल्या होत्या. गोम्स व विवि रिचर्डसन या विंडीजच्या गोलंदाजानी भारतीय फलंदाजाना सळो की पळो करून सोडले होते. त्यावेळी भारतीय फलंदाज मोहिंदर अमरनाथला ८० बाऊन्सर चेंडू फेकले गेले होते. त्याचा  मुकाबला करताना अमरनाथने तीन चौकार मारून महत्वपूर्ण अशा २६ धावा केल्या होत्या. मोहिंदरची ही  खेळी कोणताच भारतीय आज ही विसरू शकत नाही.

त्यानंतर भारतीय संघाने वेस्टइंडीज संघाचे कंबरडे मोडीत एका पाठोपाठ एक विकेट घेतल्या. परिणामी शक्य वाटत असलेली धावसंख्या विंडीजच्या संघाला उभारता न आल्याने पराभव सहन करावा लागला होता. आज या विजयाचा वाढदिवस आहे आणि म्हणून तो अविस्मरणीय आहे.

Leave a Comment