मंत्रालय उद्यापासून सुरू होईल : मुख्यमंत्री

मुंबई, दि. २४ – येत्या सोमवारी मंत्रालय सुरू झालेले असेल, असा ठाम विश्‍वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

मंत्रालयात प्रतिबंधात्मक उपाययोजना नसल्यामुळे आग आटोक्यात आली नाही, हे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले. `मंत्रालयातील अग्नीसुरक्षा सदोष असल्याचा अहवाल २००८ मध्ये सादर झाला होता. हे मात्र त्यावर उपाययोजना का केली गेली नाही, याची आपण माहिती घेऊ,’’ असे त्यांनी स्पष्ट केले.’

मंत्रालयातील सुमारे ३ कोटी कागदपत्रांचे स्कॅनिंग पूर्ण झाले आहे. त्यामुळे सर्व रेकॉर्ड जळाले, या भ्रमात कोणीही राहू नये. नोंदी करून आलेली कागदपत्रे जिल्हाधिकारी, महापालिका, मुख्य कार्यकारी अधिकारी अशा विविध कार्यालयांतून पुढे पाठवलेली असतात. त्यामुळे त्या त्या जागी संबंधित कागदपत्रे उपलब्ध असतात, असे स्पष्ट केले.

Leave a Comment