भंडार्‍यात सापडले युरेनियमचे भांडार

भंडारा, दि. २३ – अणुऊर्जेसाठी युरेनियम, थेरियमची गरज भासते. ती गरज भागविण्यासाठी रशिया, कझाकिस्तान, फ्रान्समधून आपण युरेनियमची आयात करीत आहोत. परंतु येणार्‍या काळात त्यांनी तो पुरवठा थांबविल्यास आपल्या अणुभट्ट्या बंद पडू शकतात, तो धोका लक्षात घेता देशात युरेनियमचा शोध युद्धपातळीवर सुरु आहे. याला बहुतांश प्रमाणात यश आले असून, राज्यातील  भंडारा जिल्ह्यात युरेनियमचे भांडार असल्याचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. एवढेच नव्हे तर देशात सुमारे एक लाख ७० हजार टन युरेनियमचा साठा आहे. शिवाय १० लाख टन थोरियमचा साठा आहे. तो सुमारे ५०० वर्षे पुरेल अशी माहिती भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागचे संचालक प्रतापसिंग परिहार यांनी दिली.

देशात आंध्रप्रदेश, झारखंड, राजस्थान, कर्नाटक, छत्तीसगड, महाराष्ट्रात युरेनियमचा साठा मुबलक प्रमाणात आहे. वर्तमानात एक किलो युरेनियम खरेदी करायचे असल्यास १२५ डॉलर्स मोजावे लागतात. ही किंमत कमी अधिक होत असते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment