‘एटीएम’साठी वित्तीय संस्थांनाही परवानगी !

मुंबई, दि. २३ – रिझर्व्ह बँकेने देशातील वित्तीय संस्थांना (नॉन बँकिंग) एटीएम सुरू करण्याची परवानगी दिली आहे. आता किमान १०० कोटी रूपयांची उलाढाल असणार्‍या या वित्तीय संस्थांना बँकांसाठी ‘एटीएम’ सेवा देता येणार आहे.

या संस्थांकडून चालविण्यात येणारे एटीएम डब्ल्यूएलए म्हणून ओळखले जातील, असे रिझर्व्ह बँकेने अधिसूचनेत म्हटले आहे. बँकांच्या एटीएमवर मिळणार्‍या सर्व सेवा या ‘डब्ल्यूएलए’ वर मिळू शकणार असून सर्वच बँकांचे ग्राहक या सेवेचा वापर करू शकणार आहेत.

Leave a Comment