उपांत्य फेरीत प्रवेश करणारा पोर्तुगाल नंतरचा जर्मनीचा दुसरा संघ

पोलंड, दि. २३ –  जर्मनीच्या सामी खेदीस, स्ट्रायकर मिरोस्लान क्लोस, मास्को रेऊस कर्णधार फिलीप लाहम या खेळाडूंच्या गोलच्या जोरावर जर्मनीने उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. पोर्तुगालच्या पाठोपाठ जर्मनीचा संघ हा उपांत्य फेरीत प्रवेश करणारा दुसरा संघ ठरला आहे.

दुसर्‍या उपांत्यपूर्व सामन्यात जर्मनीने ग्रीसचा ४-२ ने धुव्वा उडवला. पहिल्या सत्रापासूनच जर्मनीने सामन्यावर स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित केले. दुसर्‍या सत्रात ग्रीसच्या सामरास आणि साल्प इंगडिस यांनी गोल करत ग्रीसला लाजिरवाण्या पराभवापासून वाचवले. उपांत्य फेरीतील सामन्यात जर्मनी संघ इंग्लंड आणि इटली यांमध्ये होणार्र्या सामन्यातील विजेत्याशी खेळेल. जर्मनीचा संघ हा सामना फेव्हरीट मानला जात होता.

या सामन्यात जर्मनीसमोर ग्रीस डोके वर काढू शकला नाही. ग्रीसचा हा पराभव युरोपियन अजिंक्यपद स्पर्धेमधला सर्वात मोठा पराधव मानला जात आहे. आमच्या संघाने अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली असून, आमचा संघ सलग चौथ्यांदा उपान्त्य फेरीत पोचला आहे,असे लोएव यांनी सांगितले. जर्मनीचा संघ मागील दोन विश्‍वचषक स्पर्धांमधे उपांत्य फेरीत पोचला होता आणि २००८ साली त्यात उपविजेता ठरला होता.

आम्हाला आमच्या संघाचा अभिमान आहे. सुरूवातीला अपयश आले तरी आम्ही घीर सोडलेला नाही. काही बदल संघात होतील,पण तीन विजयांनंतर त्याची गरज आहे का, असेही ते म्हणाले. सामन्यापूर्वी लोव यांनी स्ट्रारयकर मारीओ गोमेज, फोरवर्ड खेळाडू लुकास पोडोलोस्की आणि थॉमस मुएलर यांना संघाबाहेर काढले होते. गोमेजच्या बदली संघात आलेला क्लोस हा जर्मनीचा १२०वा खेळाडू असून, या सामन्यात त्याने आंतरराष्ट्रीय फुटबॉल कारकीर्दीतल्या ६४ व्या गोलची नोंद केली. आता तो जर्मनीच्या गेर्ड म्युएलरच्या विक्रमापासून चार गोल दूर आहे.

Leave a Comment