`इंग्लिश विंग्लिश’ – श्रीदेवीची जादू

बाल्की दाम्पत्य प्रतिभावंत आहे. `चीनी कम’ आणि अमिताभ बच्चन अभिनीत `पा’ त्यांचे मनोरंजक चित्रपट होते. आता त्यांचा नवीन चित्रपट श्रीदेवी अभिनीत `इंग्लिश विंग्लिश’ लवकरच येत आहे. या चित्रपटाचा प्रोमो इतर चित्रपटांपेक्षा वेगळा आणि विचार जागृत करणारा आहे. हा प्रोमो पाहून दाम्पत्यांचा जाहिरातींचा अनुभव स्पष्ट होतो. जाहिरातीमध्ये ३० सेकंदात आपली गोष्ट सांगायची असते आणि प्रेक्षकांनी ती पाहावी यावरही लक्ष द्यावे लागते. या प्रोमोत संपूर्ण पडद्यावर सेंसर प्रमाणपत्र दिसते. आता चित्रपटाची झलक दिसेल असे आपल्याला वाटत असते, पण त्यात एक स्त्री प्रमाणपत्र वाचण्याचा प्रयत्न करताना दिसते. तिला चांगली इंग्रजी येत नाही आणि विशेष नसल्याचे स्पष्ट होते. तिचा वाचण्याच्या प्रयत्न विनोदी आहे.

कॅमेर्‍यासमोर येताच ती स्त्री म्हणते, कमालच आहे, हिंदी चित्रपटाचे प्रमाणपत्र इंग्रजीत आहे. ती स्त्री श्रीदेवी असते आणि प्रेक्षकांना नमस्कार करते.

या प्रोमोतून संपूर्ण चित्रपटाची कल्पना येते, कथेची झलक देखील दिसत नाही, मात्र चित्रपटाविषयी प्रेक्षकांची उत्कंठा वाढते. खरंतर आज भारतात इंग्रजीचा उपयोग करणार्‍यांची संख्या ब्रिटनच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे आणि त्यांची भाषा आपल्या देशात अजरामर झाली आहे. भारताच्या अनेक छोट्या शहरात आणि गावात सेंट मेरी आणि सेंट जोसेफ शाळेचे बोर्ड दिसून येतात. खरंतर भाषाची लोकप्रियता तिच्या नोकरी देण्याच्या क्षमतेवर आधारित असते. या प्रकरणात भौगोलिक सीमा आणि धार्मिक बंधन कामी येत नाहीत. कारण भाषा आता भूक आणि दैनंदिनी आयुष्याशी जोडली गेली आहे. ज्यावेळी उर्दू शिकल्याने नोकरी मिळत होती त्यावेळी अनेक धर्मांच्या महत्त्वाकांक्षी लोकांनी उर्दू शिकली आणि काही प्रसिद्ध शायर आणि महान गद्य लेखक देखील बनले. या प्रकारेच जेव्हा लॉर्ड मॅकाले यांनी सगळ्याच विषयांचा अभ्यास इंग्रजीत सुरू केला तेव्हा देखील भारतीय शिकण्यासाठी पुढे आले. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे पुस्तके इंग्रजीत असतात. त्यामुळे भाषाची लोकप्रियता आपण समजू शकतो, पण विचारात आणि व्यवहारात इंग्रजाळलेपणा आणणे योग्य नाही. इंग्रजीत स्वप्ने पाहण्याची महत्त्वाकांक्षा योग्य नाही. भारतात इंग्रजीच्या प्रचारासाठी नियुक्त समितीने दोन दशकांपूर्वी निर्णय घेतला होता की, इंग्रजी शिकण्यासाठी व्याकरणावर भर देण्यापेक्षा, भारतीय जीवनशैलीत इंग्रजाळपणाला महत्त्व देणे जास्त प्रभावी ठरेल तसे झाले तर भारतीय स्वत: व्याकरणयुक्त भाषा शिकण्याचा प्रयत्न करतील. प्रभू जोशी यांनी आपल्या एका लेखात ही बाब लिहिली होती.

त्याच काळात जाहिराती विश्वात इंग्रजी आणि इंग्रजाळलेपणाच्या धाकामुळे वर्तमानपत्रात भाषेचे स्वरूप बदलले आणि अनेक हिंदी वर्तमानपत्रांनी इंग्रजीत एक किंवा दोन पाने काढायला सुरुवात केली. सिनेमाचा समावेश असलेल्या लोकप्रिय संस्कृतीने देखील या योजनेत भरपूर मदत केली. कारण हा देखील बाजाराच्या ताकदीचा एक भाग आहे. भारतात १७ कोटी वर्तमानपत्र वाचणार्‍यांमध्ये हिंदी आणि क्षेत्रीय भाषेचे १५ कोटी वाचक आहेत. असे असूनही इंग्रजीचा प्रभाव अधिक आहे. चित्रपट उद्योगात देखील इंग्रजीत लिहिलेल्या समीक्षेला महत्त्व दिले जाते. तथापि, हिंदी आणि इतर भारतीय भाषेची वाचक संख्या जास्त आहे.

कोणताही देश इतर देशांच्या भाषेत भेसळ करण्यासाठी इतका पैसा का खर्च करतो? भाषा कमकुवत झाल्यावर व्यक्तीची विचार करण्याची ताकद कमी होते. असेच लोक बाजारात अनावश्यक वस्तूंच्या जास्त किमती मोजतात, म्हणूनच मल्टिनॅशनलदेखील आपल्या जाहिराती देण्याच्या ताकदीमुळे या खेळात सामील झाली आहे.

असो, श्रीदेवी खूप वर्षांनंतर परतली आहे, पण डीवीडीमुळे कोणताच कलाकार बाजारातून बाहेर गेलेला नाही. त्यामुळे जो गेलाच नाही त्याचे पुनरागमन कसले?

३० सेकंदाच्या प्रोमोत श्रीदेवी फक्त १० सेकंदच प्रेक्षकांच्या समोर असते. तिच्या डोळ्यात पूर्वीसारखीच चपळता आहे. हसण्यातदेखील निरागसपणा कायम आहे. निरागसपणा आणि मादकतेचा कॉकटेल सादर करणारी ती पहिली कलाकार होती. बाल्की दाम्पत्य अभिनंदनास पात्र आहे.

Leave a Comment