मुंबई, दि. २३ – नियमांचे उल्लंघन करून सिमेंटची एकत्रितपणे चढया भावाने विक्री केल्याप्रकरणी देशातील आघाडीच्या ११ सिमेंट उत्पादक कंपन्यांना सीआयआयने ६२०० कोटी रूपयांचा दंड ठोठावला आहे.
मुंबई, दि. २३ – नियमांचे उल्लंघन करून सिमेंटची एकत्रितपणे चढया भावाने विक्री केल्याप्रकरणी देशातील आघाडीच्या ११ सिमेंट उत्पादक कंपन्यांना सीआयआयने ६२०० कोटी रूपयांचा दंड ठोठावला आहे.
एसीसी, अंबुजा सिमेंट, अल्ट्राटेक, जयपी सिमेंट, मद्रास सिमेंट, ग्रासिम सिमेंट, जे.के.सिमेंट, इंडिया सिमेंट, बिनानी सिमेंट, लाफार्ज सिमेंट, सेच्युरी सिमेंट या कंपन्यांवर सीआयआयने दंडात्मक कारवाई केली आहे. या कंपन्यांवर ६२०० कोटी रूपयांचा दंड आकारण्यात येणार असून, येत्या ९० दिवसांमध्ये दंडाची रक्कम जमा करण्याचे आदेशही दिले आहेत.
या कंपन्यांनी स्पर्धा प्रतिबंध कराराशी संबंधित असलेल्या स्पर्धा कायदा-२००२ चा भंग केल्याचे निदर्शनास आले आहे. या कंपन्यांनी संगनमताने एकत्रित सिमेंटची भाववाढ करीत विक्री केली असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याचे एका अधिकार्याने सांगितले. सीआयआयने कंपन्यांबरोबर या उत्पादक कंपन्यांची शिखर संघटना असलेल्या सिमेंट उत्पादक संघालाही दंड ठोठावला आहे.